आयुविमा कार्यालयाचे काम कासवगतीचे

आयुविमा कार्यालयाचे काम कासवगतीचे

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) भारतीय आयुविमा कार्यालयातील (Indian Life Insurance Office) कासवगतीने सुरू असलेल्या कामकाजावरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी (BJP workers) आक्रमक होत अधिकार्‍यांना घेराव घातला.

कामातील शिथिलतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. जलद सुविधा न दिल्यास आंदोलनाचा (agitation) दणका देवू असा इशारा भाजपचे किसान मोर्चाचे राज्य सचिव बापूसाहेब पाटील (BJP's Kisan Morcha state secretary Bapu Saheb Patil) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी दिला आहे.

पिंपळगाव आयुविमा कार्यालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हा मुद्दा घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव (Pimpalgaon) कार्यालयावर धडक दिली. दस्ताऐवज सापडत नसल्याने विमाधारकांची कोणतीही चूक नसतांना त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. विम्याच्या आधारावर मिळणारे कर्ज प्रकरणे (Debt cases) मंजूर होण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे.

पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांना तिष्टत उभे रहावे लागत आहे. खरीप हंगाम (kharip season) सुरू झाला आहे. भांडवलासाठी शेतकर्‍यांनी (farmers) विम्यावर कर्ज प्रकरण सादर केली आहे. पण दोन महिन्यानंतरही ती मंंजूर झालेली नाही. या तुघलघी कारभारात त्वरित सुधारणा करावी व विमाधारकांना जलद सुविधा द्या अन्यथा तीव्र आंदोलन (agitation) छेडण्याचा इशारा बापूसाहेब पाटील व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

यावेळी शाखाधिकारी वाघ यांना निवेदन (memorandum) देण्यात आले. याप्रसंगी अल्पेश पारख, गोविंद कुशारे, प्रशांत घोडके, विशाल निळकंठ, संदीप झुटे, दत्तू काळे, संदीप दौंंड, दिगंबर लोहिते, प्रकाश घोडे, रवींद्र तिडके, गणेश घुमरे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com