शिक्षक पतसंस्था आदर्शवत

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांचे गौरवोद्गार
शिक्षक पतसंस्था आदर्शवत

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

समाजामध्ये बदल करुन पिढी घडविण्याची ताकद शिक्षकांकडे असते. हीच ताकद व नीतिमूल्ये ते विविध क्षेत्रात वापरतात. त्यामुळेच शिक्षकांच्या पतसंस्थांचे काम आदर्शवत होत असल्याचे गौरवोद्गार मविप्रच्या सरचिटणीस (General Secretary of MVP) नीलिमा पवार (nilima pawar) यांनी येथे केले.

देवपूर (devpur) येथील सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर सोसायटीच्या (secondary teacher society) सिन्नर (sinnar) उपशाखेचे एस.जी.पब्लिक स्कूलच्या कॅम्पसमधील उद्घाटनप्रसंगी कै. अंजनाबाई गडाख सभागृहातील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आमदार डॉ. सुधिर तांबे (MLA Sudhir Tambe), माजी आ. नानासाहेब बोरस्ते, अ‍ॅड. नितीन ठाकरे, जि.प. सदस्या सिमंतीनी कोकाटे, माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख,

सोसायटीचे संस्थापक दौलतराव मोगल, संचालक विजय गडाख, सचिव राजेश गडाख, व्यवस्थापक अभिषेक गडाख, ‘स्टाईस’च्या प्रशासकीय अध्यक्ष सुधाताई माळोदे-गडाख, उपाध्यक्ष नारायण पाटील, मधुकर भालेराव, सोसायटीचे चेअरमन रावसाहेब तांबे, उपाध्यक्ष विलास पाटील यांच्यासह संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते. संचालक मंडळाने प्रामणिकपणे काम करावे, वेळ द्यावा, कर्ज लवकर मंजूर करा असा सल्ला निलीमाताईंनी दिला.

गडाख नानांच्या नावाने स्थापन झालेल्या या पतसंस्थेमध्ये निधन झालेल्या सभासदाचे सर्व कर्ज माफ केले जाते हे कौतुकास्पद आहे. संस्थेचे कामकाजही नानांच्या कर्तृत्वाप्रमाणे चालवावे, असे आमदार डॉ. तांबे म्हणाले. सहकाराचे कंबरडे मोडलेले असताना शिक्षकांच्या पतसंस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अलीकडच्या काळात काही धोरणामुळे सहकार मोडकळीस आला असल्याची भावना बोरस्ते यांनी व्यक्त केली.

नानासाहेबांचा सेवाभाव संस्थेच्या माध्यमातून जपला जात आहे. सोसायटीच्या अडचणी सोडविण्यासाठी संस्था तत्पर असल्याचे मत अण्णासाहेब गडाख यांनी व्यक्त केले. यावेळी निवृत्त व पदोन्नती झालेले सभासद, संस्थेचे व्यवस्थापक निरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष रावसाहेब तांबे यांनी केले. सूत्रसंचलन दत्तात्रय आदिक यांनी केले. कार्यवाह नानासाहेब खुळे यांनी आभार मानले.

डॉ. तांबे मविप्रचे आमदार

संस्थेचे तिन सभासद आमदार आहेत. मात्र, डॉ. तांबे हे संस्थेची मंत्रालयातील सर्व कामे करतात. अगदी तुकड्यांच्या परवानगीसह छोटी-छोटी कामेही ते करुन आणतात. त्यांना भेटणं सहज शक्य होतं. शासनासमोर कुणाचंही काम शांत, संयमीपणे मांडतात. गरज पडली तर कशात ते काम बसवायचे, त्याचा मार्गही ते काढून देतात. त्यात त्यांच्या कामाचा प्रभावीपणा दिसून येतो. त्यामूळेच डॉ. तांबे हे मविप्रचे आमदार असल्याचे आपण अभिमानाने सागंतो असं निलिमाताई म्हणाल्या.

Related Stories

No stories found.