सुंदरनारायण मंदिराचे काम 'या' महिन्यात होणार पूर्ण

सुंदरनारायण मंदिराचे काम 'या' महिन्यात होणार पूर्ण

पंचवटी । प्रतिनिधी | Panchavati

दिवाळीनंतर (diwali) येणार्‍या एकादशीला हरिहर भेट साजरी केली जाते. कपालेश्वर मंदिरातून (Kapaleshwar temple) बेलाचा हार सुंदरनारायण मंदिरातील (Sundernarayan Temple) विष्णू भगवान यांना अर्पण केला जातो

तर विष्णू भगवान यांचा तुळशी हार कपालेश्वरच्या महादेवाला अर्पण करून सोहळा साजरा करण्यात येतो. अनेक वर्षांची परंपरा नाशिक (nashik city) शहरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोपासली जात आहे.

पुरातत्त्व विभागाकडून (Department of Archaeology) नाशिकचे वैभव असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुलाजवळील सुंदरनारायण मंदिराच्या कामास गेल्या चार वर्षांपासून सुरुवात झाली आहे. प्रारंभी मंदिराच्या शेजारी इलेक्ट्रिक डीपी असल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता. डीपी हलवण्याच्या कामाला उशीर झाल्याने मंदिराच्या कामालादेखील गती मिळाली नाही. त्यानंतर करोनाची (corona) महामारी सुरू झाली आणि काम ठप्प झाले.

कामावर असलेले कारागीर करोनाच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे काम होऊ शकले नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत डिसेंबरअखेर मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून (Department of Archaeology) सांगण्यात आले आहे.

सुंदरनारायण मंदिराचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असे पुरातत्त्व विभागाच्या विभागीय अधिकारी आरती आळे (Divisional Officer of Archeology Department Aarti Ale) यांनी सांगितले. सतत पडणार्‍या पावसामुळे, लॉकडाऊनमुळे व डीपीच्या अडचणीमुळे आणि वेळोवेळी विविध संकटांमुळे, मजुरांची कमतरता निर्माण झाल्यामुळे सुंदरनारायण मंदिराचे काम करण्यास अडचणी निर्माण झाल्या.

मंदिराच्या कामाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मंदिराचे पूर्ण होईल आणि यंदा हरिहर भेटीचा कार्यक्रम दिमाखात होईल, अशी भाविकांची अपेक्षा होती; परंतु मंदिराचे काम अपूर्ण असल्याने यंदाही मंदिरातील हरिहर भेटीला भाविक मुकणार असे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून (central government) पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी साडेबारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या कालावधीसाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात होता. आजपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्याने जीर्णोद्धाराच्या कामास विलंब होत असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या विभागीय अधिकारी आरती आळे यांनी सांगितले. डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com