उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावणार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आश्वासन
उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावणार

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा कुटुंबकल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांची निवड झाल्याने कळवण- सुरगाणा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे जाऊन निर्माण भवनात भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत सुरगाणा तालुक्यातील आरोग्याच्या समस्यांवर चर्चा केली.

यावेळी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आदिवासी भागातील कोविड लसीकरणाबाबतीत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी जनजागृतीकडे लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढवण्याकरता सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पदाधिकार्‍यांनी केली असता लवकरच हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर करण्यात आले की, तालुका हा आदिवासीबहुल असून अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात मंजूर करण्यात यावे. याबाबतीत पाठपुरावा करून तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

उंबरठाण, बोरगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे. बार्‍हे, उंबरठाण, पांगारणे, खोकरविहीर, श्रीभुवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात भाजप ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सरचिटणीस एस. के. पगार, जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, कोषाध्यक्ष रामकृष्ण पगार, दीपक खोत, गोरखनाथ महाले, हिरामण चौधरी आदी उपस्थित होते. निवेदनावर दिनकर पिंगळे, सचिन महाले. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रभाकर पवार, सुरेश देशमुख, हेमराज धूम, नारायण महाले, रामदास चौधरी, यमुना वार्डे, सलमान शेख, युवराज चौधरी, हिरामण चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com