नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गोदातीरावरील पूरातन नीलकंठेश्वर मंदिर (Neelakantheshwar Temple) परिसराच्या पुरातन पायर्या (Ancient steps) 15 दिवसात बांधून देण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीच्या (smart city) अधिकार्यांनी दिले होते. मात्र 15 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही काम थांबलेल होते.
गोदाप्रेमींच्या रेट्यानंतर काम वेगाने सुरू करण्यात आले असून पायर्यांचे काम (Step work) आठवडाभरात पूर्ण करण्याचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या (Smart City Corporation) वतीने ब्युटिफिकेशन (Beautification) अंतर्गत विविध कामे केली जात आहे.
या कामासाठी राज्य पुरातत्व विभागाने (Department of State Archaeology) संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील गोदाकाठ परिसरात प्रोजेक्ट गोदा पायर्यांचे काम गतिमान करण्यात आले आहे.
गोदाकाठाचा इतिहास पुसला जात असल्याचा आराप करित संतप्त गोदाप्रेमी, सकल हिंदू समाजाच्या वतीने स्मार्ट सिटीच्या कामाविरोधात आंदोलन (agitation) करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर स्मार्टसिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सीईओ सुमंत मोरे (CEO Sumant More) यांनी पायर्या हे बांधण्याचे काम पंधरा दिवसात करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच याबाबत त्या ठिकाणी पाहणी दौराही केला होता.
अशी परिस्थिती असतांना या पार्श्वभूमीवर पायर्या बांधण्याबाबत विलंब होत होता. आता या पायर्या बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.याबाबत गोदाप्रेमी, सकल हिंदू समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.