जलसंधारणात स्वयंसेवी संस्थांचे कार्य कौतुकास्पद: विखे पाटील

‘सुनील स्मृती जलयोद्धा पुरस्कार’ वितरण
जलसंधारणात स्वयंसेवी संस्थांचे कार्य कौतुकास्पद:  विखे पाटील

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

आज स्वयंसेवी संस्था (Voluntary Organization) नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकर्‍यांच्या (farmers) व समाजाच्या हिताची अनेक कामे करत आहेत.

जलसंधारणाच्या (Water conservation) कामांमध्ये या संस्थांचे मोठे योगदान असून त्यांच्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra) दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन महसूल (harsul), पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Animal Husbandry and Dairy Development Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

येथील युवा मित्रकडून आज (दि.14) ‘सुनील स्मृती जलयोद्धा व जीवन गौरव’ पुरस्काराचे वितरण (Distribution of Award) करण्यात आले. यावेळी ना. विखे पाटील बोलत होते. युवा मित्रचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुनील पोटे यांच्या स्मृती स्मरणार्थ यावर्षीपासून हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाच्या प्रथम पुरस्कार अंबाजोगाईचे लालासाहेब रामचंद्र आगळे (मानवलोक मराठवाडा नवनिर्माण लोकायत) यांना

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 1 लाख रुपये तर द्वितीय पुरस्काराचे मानकरी सांगोल्याचे मधुकर तुकाराम पवार (माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान) यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 50 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील (maharashtra) चारा छावणी संकल्पनेचे जनक व डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला (Agricultural Development and Research Institute Sangola) येथील ललित परसू बाबर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यात लंपी आजाराचा (Lumpy disease) प्रादुर्भाव वाढल्याने ते प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे (Online broadcasts) संवाद साधून मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संपत काळे, कार्यकारी संचालिका मनीषा पोटे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, मृदा व जलसंधारण विभागाचे अभियंता हरिभाऊ गीते (Haribhau Geete, Engineer, Soil and Water Conservation Department), जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, अविनाश लोखंडे, सागर शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह पुरस्कार्थी उपस्थित होते.

लोकसहभागाशिवाय कुठलीही चळवळ मोठी होत नसते. जलसंधारणच्या कामात याची नितांत गरज असते. स्वयंसेवी संस्थांकडून यासाठी प्रयतक् केले जातात आणि शेवटी घडते ती जलक्रांती असे ना. विखे पाटील म्हणाले. युवा मित्रकडूनही अशाच प्रकारचे काम सुरू असून स्व. सुनील पोटे यांच्या स्मरणार्थ संस्थेकडून जलसंधारणात काम करणार्‍यांचा गौरव होतेय ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी त्यांनी पुरस्कार्थीचे कौतुक करत त्यांच्या कामाचे स्वागत केले.

यापुढील काळात सरकारी पातळीवर आवश्यक ते सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली. स्व. पोटे यांचे काम सन्माननीय होते. त्यांच्या स्मृती आयुष्यभर स्मरणात राहायला हवी. त्यांच्या पश्चात मनीषाताई करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोकाटे यांनी केले. तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी युवा मित्रचे योगदान मोठे असून पुढील काळातही ते असेच सुरु राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी पाणी व शेती विकास संदर्भात आपापली मते मांडली. कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या विश्वस्त दिप्ती राऊत यांनी सूत्रसंचलन व आभार मानले.

विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान: बाबर

राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे जेवढे मोठे योगदान आहे तसेच राज्यांतील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे राज्याच्या विकास मोठी भर पडल्याचे जीवन गौरव पुरस्कार्थी ललित बाबर म्हणाले. या संस्थांनी भटक्या, अनुसूचित जाती, पाणी प्रश्न, शेतकरी प्रश्न आदी प्रश्नांवर मोठे काम केले आहे. चांगल्या संस्थांमुळे राज्याचा नेहमीच विकास घडत आला असून शासनाने याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com