कर्मवीरांचे कार्य प्रेरणादायी

कर्मवीरांचे कार्य प्रेरणादायी

सिन्नर | वार्ताहर Sinnar

बहुजन समाजाला (Bahujan Samaj) शिक्षणाच्या (Education) प्रवाहात आणण्याचे काम महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी केले तर बहुजन विद्यार्थ्यांना (Bahujan students) शिक्षणाच्या (Education) प्रवाहात आणण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) मोलाचा वाटा आहे.

तसेच संस्थेच्या विकासात मविप्र संस्थेच्या कर्मवीरांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तालुक्यातील गोंदे येथील मविप्र समाजाच्या डी. के. तांबे सर जनता विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन (Inauguration of the building) व नामकरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संस्थेसाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate), माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), संस्थचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस निलीमा पवार (Nilima Pawar), रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगिरथ शिंदे (Vice President of Rayat Shikshan Sanstha Adv. Bhagirath Shinde), व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे कोंडाजी आव्हाड (V. N. Kondaji Awhad of Naik Shikshan Sanstha), मविप्र संचालक हेमंत वाजे, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, सरपंच अनिल तांबे, उपसरपंच लता वाघ, पोलिस पाटील ज्योती तांबे उपस्थित होते.

पवार यांनी सहभाग हा संस्थेचा पाया असून तालुक्यातील एकही शाळेसाठी संस्थेला जागा विकत घ्यावी लागली नाही असे सांगितले. तर संस्थेच्या शिक्षकांनी कोरोना काळात खेडोपाडी जाऊन शिक्षण दिले आहे. यावेळी त्यांनी तांबे सर यांच्या स्वभाव वैशिष्टयांची आठवण करुन दिली. अ‍ॅड. शिंदे यांनी शिक्षणाचे आधुनिकरण व गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थांंनी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. शाळेला तांबे सर यांचे नाव दिल्याने त्यांच्या कार्याला न्याय मिळाळा असे मत व्यक्त केले.

आव्हाड यांनी दानशूर व्यक्तिंच्या कार्यामुळे संस्था मोठ्या होत असल्याचे सांगितले. यावेळी शाळेत मल्लखांबचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच शाळेसाठी जमीन दान करणार्‍या रामनाथ तांबे, लक्ष्मण तांबे, रंगनाथ तांबे, जयराम तांबे या चारही बंधूंचा सत्कार करण्यात आला. गावातील दिपक शेलार व दत्तू शेलार यांनी ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली. प्रास्तविक हेमंत वाजे यांनी केले. सुत्रसंचालन एस. टी. पांगारकर यांनी केले. संजय तांबे यांनी आभार मानले.

क्रीडांगणासाठी 10 लाख

कर्मवारांच्या त्यागाने संस्था मोठ्या झाल्या आहेत. शिक्षणाचा पॅटर्न बदलत चालला आहे. त्यानुसार सर्वांनी बदलले पाहिजे असे आमदार कोकाटे यांनी सुचित केले. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर.ओ प्लाट व आमदार निधीतून शाळेच्या क्रिडांगणासाठी 10 लाख देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com