कळवण नगरपंचायतीचे कामे दर्जाहीन

छावा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
कळवण नगरपंचायतीचे कामे दर्जाहीन

पुनदखोरे | वार्ताहर | Punadkhore

कळवण नगरपंचायतीतंर्गत (Kalvan Nagar Panchayat) सुरू असलेले कामे दर्जाहीन होत असून या कामांबाबत चौकशी करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने (chava krantiveer sena) वेळोवेळी करण्यात आली आहे...

याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याने निकृष्ठ कामांचा धडाका शहरात सुरूच आहे. कामांची तत्काळ चौकशी न झाल्यास उपोषणाचा (Agitation) इशारा छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार (Pradeep Pagar) यांनी दिला आहे.

कळवण शहरातील नव्याने सुरु असलेले रस्ते, भूमीगत गटारी, संरक्षण भिंती आदी कामे होत आहे. कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची होत आहे. रस्ते अक्षरक्ष: तरंगतलाव झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या समस्यांना रोजच सामोरे जावे लागत आहे.

त्याचप्रमाणे शहरातील पुंजाराम कॉलनी (Punjaram Colony) परिसरात गटारींचे काम सुरू असून त्या गटारीच्या चेंबरमध्ये साचलेल्या पाण्यातच वाळू, खडी, सिमेंट टाकून काम सुरु आहे. पाण्यात संपूर्ण सिंमेट धुवून जात असल्याने तेथे फक्त वाळू व खडीचा वापर होत आहे.

याबाबत नगरपंचायत प्रशासनाला मार्च महिन्यात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. पंरतु गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मात्र ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे.

निकृष्ठ काम करणार्‍या तसेच कामात दिरंगाई करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी यावेळी छावाच्या वतीने करण्यात आली आहे.

शासनाने कळवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी (Fund) उपलब्ध करून दिला आहे. शहराचा विकास होण्याऐवजी ठेकेदार व अधिकारींचाच विकास होतांना दिसत आहे.

शहरात सुरु असलेले निकृष्ठ कामे तत्काळ थांबवून संबंधितांची चौकशी करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी केली असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

कळवण शहरातील मोठादेव नाल्याची संरक्षण भिंत मजबूत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. मात्र मोठया प्रमाणात दगडांचा वापर तसेच मातीमीश्रीत वाळू, खडी, निविदेप्रमाणे स्टील न वापरणे आदी बोगस कामे येथे सर्रासपणे सुरु आहे. या कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी.

- श्रीराम पवार, स्थानिक नागरिक

कामांबाबत अधिकारी व ठेकेदारांचे संगतमत आहे. निकृष्ठ होत असलेले कामांसंदर्भात प्रशासन दखल घेत नाही. त्यातच कळवण नगरपंचायतीचे तथाकथित मुख्याधिकारी म्हणतात की, सर्व कामे नियमानुसार होत आहेत? छावाचा आरोप राजकीय हेतूने आहे. मग कित्येक दिवसांपासून सुरू असलेले कामे अपुर्ण का आहेत?

- प्रदीप पगार, तालुकाध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com