जऊळके-दिंडोरी जि.प. प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद

ग्रामीण पोलिस अधिक्षक पाटील यांचे गौरवोद्गार
जऊळके-दिंडोरी जि.प. प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी गाव Jaulke Dindori Village हे विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून ओळखला जातो. या गावात आरोग्य व शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा Jaulke Dindori Zilla Parishad Primary School उल्लेख केला जातो. या शाळेला नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil यांनी अचानक सदिच्छा भेट देवून कौतुकाचा वर्षाव करत या गावाने शिक्षणासाठी दिलेले योगदान आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले.

नाशिक जिल्ह्यात जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद शाळेत पहिलीच लॅपटॉप लॅब साकारली जात आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी लॅब मदतरूप ठरणार आहे. जऊळके दिंडोरी शाळेत 1 ली ते 7 वी इयत्तेच्या 210 विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी व अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ मनोरंजक व्हावी, या हेतूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व तुकाराम जोंधळे यांचे विशेष प्रयत्नातून शाळेत 25 लॅपटॉपची लॅब साकारली जात आहे.

जिल्ह्यातील ही पहिलीच लॅब असल्याने जऊळके शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे. याच वर्षी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्ताराधिकारी सुनीता आहिरे, केंद्रप्रमुख शरद कोठावदे यांचे मार्गदर्शनाखाली नालंदा प्रकल्प अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना 40 टॅबच्या माध्यमातून शिकवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आनंददायी पध्दतीने अध्ययन अध्यापनात रस घेऊ लागले आहे. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी या शाळेतील नाविण्यपूर्ण प्रयोगशाळेत भेट दिली. यात मोठे एक्झिबिट्स, विज्ञान किट, गणित किट, माहिती तक्ता, एक स्टॅड, एक एलएफडी टीव्ही, 16 टेबल, दोन मोठे कपाट सुसज्ज असे खाजगी शाळेला लाजवेल असे आधुनिक प्रयोग शाळा बघुन सचिन पाटील भारावरुन गेले.

शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत प्रयोगशाळा उभारण्यात आली असून 520 प्रकारचे प्रयोग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रयोशाळेचा विद्यार्थी लाभ घेत आहे. या शाळेत स्कॉलरशिप परीक्षेत 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे. करोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षकांनी स्मशानभूमीत शाळा भरवली. त्यामुळे हा उपक्रम लक्षवेधी ठरला. शालेय आवारात वृक्षारोपण सौंदर्य वाढवत आहे. युवा नेते तुकाराम जोंधळे यांच्या प्रयत्नातून शाळेला सुसज्ज अशी लॅपटॉप लॅब साकारली जात आहे. त्यासाठी आवश्यक फर्निचर दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून 25 लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहे.

लॅबच्या दर्शनी भागातील भिंतीवर संगणक किबोर्डची थ्री डी प्रतिमा साकारण्यात आली आहे. शाळेविषयी परिपुर्ण माहिती जाणून घेऊन एकुणच शाळेच्या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच भारतीताई जोंधळे, युवा नेते तुकाराम जोंधळे, वनारवाडीचे उपसरपंच दत्तू भेरे, शिवनईचे पोलिस पाटील पांडूरंग गडकरी, रावसाहेब जोंधळे, हर्षल काठे, प्रवीण जोंधळे, मुख्याध्यापिका शैलजा मोरे, कांतीलाल भरसट, संगीता जोपळे, कमल देवरे, कल्याणी वासेकर, उत्तम भोये, हरिभाऊ बच्छाव, सुप्रिया धोंडगे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com