पदवीधर प्राथमिक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायीः आ. डॉ. तांबे

पदवीधर प्राथमिक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायीः आ. डॉ. तांबे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे (Nashik District Graduate Primary Teachers Cooperative Credit Institutions) सामाजिक (social), आर्थिक (financial) व शैक्षणिक (education) कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे.

जिल्हाभरातील सर्व पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) व शिक्षिका यांना संघटित करून त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना प्रोहत्सान देण्याचे काम सर्व पदाधिकारी करीत आहेत, ही बाब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी केले.

संस्थेची 21 वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे कोशाध्यक्ष भास्कर भदाने (State Treasurer Bhaskar Bhadane) होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक विठ्ठलराव धनाईत (Founder President Mentor Vitthalrao Dhanait), विभागिय अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन महारू निकम (Departmental President and Chairman of the Institute Maharu Nikam), विभागचे अध्यक्ष अंबादास अहिरे, सरचिटणीस संजय बोरसे, कार्याध्यक्ष मोतीराम सहारे, जयराम महाजन सर्व संचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दोन वर्षातील विविध तालुक्यातील गुणवंत शिक्षक व शिक्षिका यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या अहस्ते गाऊर्व करण्यात आला. यावेळी वि.का.धनाईत, महारू निकम, आंबादास अहिरे व भास्कर भदाने यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक महारू निकम यांनी केले. संभाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले. अतुल आहेर यांनि सर्वांचे आभार मानले.

संचालक धनराज सागणे,विजय निकम,पंढरीनाथ नाईकवाडे,अमोल झाडे,नितिन नानकर,भागवत चौधरी,कारभारी गावंदे, संभाजी पवार,भास्कर बागूल,राजू दातीर,पांडुरंग देवरे,सरला बछाव,संगीता पवार,यांच्यासह दिलीप अहिरे, सतीश कापडणीस उपस्थित होते.

यांचा झाला गौरव

सन-2021 वर्षातील पुरस्कार कमल दाते, संजय हिरे, संतोष चव्हाण, तुषार महाजन, दीपक बागूल, कल्पना गीते, देवीदास जाधव, प्रशांत कापडणीस, तुकाराम भोये, अनिल खैरनार, शरदचंद्र भामरे, राजेंद्र कापडणीस, विलास पाटील, मोहिदीन कुरेशी, गायत्री राजपूत, बापू जगताप, याच वर्षातील विशेष कामगिरी करणारे नीलेश भामरे,संभाजी पवार,जयदीप गायकवाड, गंगाधर चौधरी

सन-2022 वर्षातील पुरस्कार

रामदास शेवाळे, उत्तम चौधरी,मनीषा मारवाडी,अनिल माली,संतोषा पंचेरिया ,सुरेषा गायकवाड,हेमराज पवार,बेबी रोहम,राजेंद्र मगर,मनोहर देसले, अशोक देवरे,मुकुंद कुलकर्णी,उत्तम चौधरी,शिला सोनवणे,अर्चना कातकाडे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com