जुन्या विहीरीलाच नवीन दाखवण्याचा प्रकार

जुन्या विहीरीलाच नवीन दाखवण्याचा प्रकार

ठाणापाडा । गणेश धुळे Thanapada-Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) आंबाठा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान पेयजल योजनेंतर्गत (Prime Minister's drinking water scheme) झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या विहीरीलाच नवीन विहीर (Well) दाखवून निधी (fund) लाटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. संबंधित विभागमार्फत याबाबत सखोल चौकशी होवून कार्यवाहीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सन 2020 ते 2021 यावर्षासाठी आंबाठा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान पेयजल योजनेंतर्गत जवळपास 32 लाख रक्कमेची पेयजल अंतर्गत विहीर, पाण्याची टाकी (water tank), जलवाहिनी (Water duct) आदी कामे केली आहे. परंतू ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याने गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना ही बाब लक्षात आणून देवून संबंधित ठेकेदाराला वारंवार तोंडी सूचना देवून देखील संबंधित ठेकेदार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

टाकीचे काम योग्य रितीने झालेले नाही. टाकी बांधकाम (Tank construction) करत असताना बांधकामावर कधीही पाणी मारलेले दिसले नाही. या योजनेमध्ये विहीर ही स्वंतत्र बांधायला पाहिजे होती, परंतु असे न करता ठेकेदाराने ग्रामपंचायतीची (grampanchayat) पुर्वीची विहीर दाखवून ही योजना राबवून पुर्ण कामे केले आहे. जलवाहिनीमध्ये जे पाईप वापरले आहेत. त्यांची प्रत चांगली नाही विहीरीपासुन ते टाकीपर्यंत हे लोखंडी पाईप वापरले पाहिजे होते. परंतु तिथे सुध्दा साधे प्लॅस्टीक पाईप (Plastic pipe) वापरले.

त्यामुळे हा पंतप्रधान पेयजल योजनेचे काम फक्त निधी लाटण्यासाठी पूर्ण केला की काय? असा संशय व्यक्त होत आहे. गावकर्‍यांनी योजनेच्या रक्कमेविषयी विचारपूस केली असता फक्त बत्तीसलाख रूपये इतकी रक्कम मंजूर आहे. संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असा टक्केवारीमुळे कामाची प्रत ढासळली असे सांगण्यात येते.

अशी टक्केवारी कोणकोणाला वाटण्यात आली याचाही शोध लागणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित विभागाने सखोल चौकशी करुन या कामाची दर्जा तपासून सखोल चौकशी करावी व निधीचा होणार अपहार थांबवून यामध्ये सहभागी असणार्‍या सर्वांनाच कडक शासन व्हावे, अशी अपेक्षा एकनाथ वाघमारे, भास्कर पवार, शंकर पवार, पंप्पू गांगोडे, भागवत वाघमारे, आनंदा पवार, भागवत पवार यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com