अखेर त्या महिलेचा मृतदेह सापडला

अखेर त्या महिलेचा मृतदेह सापडला
USER

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

विंचुरी दळवी (Vinchuri Dalvi) येथील विवाहिता प्रियंका राजू दळवी वय २० वर्षे या महिलेने शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी भगुर दारणा नदीच्या (Darna river) पुलावरून खोल पाण्यात उडी घेतली होती काल दिवसभर रात्री उशिरापर्यंत महीलेला सापडण्याचा प्रयत्न जीवरक्षक करत होते.

परंतु ती महीला सापडली नव्हती जीव रक्षक गोविंद तुपे (Lifeguard Govind Tupe), विजय कातोरे, हरीष चौबे, संपतराव घुगे यांच्या अथक प्रयत्नानंतर काल दुपारी २ वाजता म्हणजे चोवीस तासांनी त्या महिलेचा मृतदेह (woman's body) दारणा नदी पुला जवळच सापडला देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन (Deolali Camp Police Station) च्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठविण्यात आला आहे मूर्त महिलेच्या पश्चात पती, सासु,सासरे,आई असा परिवार आहे. तरूण महिलेने आत्महत्या केल्याने विंचुरी दळवी सह परिसरात मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.