इंदिरानगर l Indira nagar (वार्ताहर) :

पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे साठ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दुचाकी स्वाराने खेचून पोबारा केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी दरेकर (३१, मातोश्री बंगला, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा) या शनिवार (दि. २७) रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाथर्डी गावाकडून पाथर्डी फाटा कडे पायी जात

असताना समोरून आलेल्या काळा रंगाच्या दुचाकीवरील इसमाने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची पोत सुमारे 60 हजार रुपये किमतीची बळजबरीने ओरबाडुन पाथर्डी फाटाच्या दिशेने निघून गेला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पो नि नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत