वाईन उद्योगाला 13 कोटींचा परतावा; अजूनही ‘इतके’ थकीत

वाईन उद्योगाला 13 कोटींचा परतावा; अजूनही ‘इतके’ थकीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाईन उद्योगाला (Wine industry) प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी भरलेल्या 20 टक्के व्हॅटवर (VAT) राज्य सरकारच्या (State Government) उद्योग विभागाकडून 16 टक्के परतावा दिला जातो. मात्र, वर्षानुवर्षे हा परतावा (Return) थकीत आहे...

2021-22 या वर्षासाठी साडेतेरा कोटींचा निधी (Fund) उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात राज्यातील तेरापैकी नाशिकमधील (Nashik) दहा वायनरींचा (Winery) समावेश आहे.

यंदाही 32 कोटी 84 लाखांच्या परताव्याचा प्रस्ताव देऊनही वित्त विभागाने 13 कोटी 50 लाख रुपये रक्कमच मंजूर केली आहे. ऊर्वरीत 19 कोटी 34 लाखांची रक्कम सरकारकडून (Government) लवकर मिळावी, अशी मागणी वाईन उत्पादकांनी केली आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना (Farmers) द्राक्ष (Grapes) लागवडीस प्रोत्साहन मिळावे व वाईन उद्योगास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकारने द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण 2001 जाहीर केले आहे.

त्यानुसार राज्यात उत्पादित केलेल्या वाईनच्या विक्रीवर देय असलेल्या 20 टक्के मूल्यवर्धीत कर (Tax) रुपये भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या देण्याबाबत रकमेइतके प्रोत्साहन, अनुदान वाईन प्रस्ताव उद्योगास देण्याबाबतची योजना (scheme) सरकारने 31 ऑगस्ट 2008 पासून सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत 2019-20 या वितरणासाठी आर्थिक वर्षात प्रलंबित असलेले दावे निकाली काढण्यासाठी उद्योग विभागाने 32 कोटी 84 लाख 22 हजार 630 इतका निधी उलपब्ध करून राज्याच्या वित्त विभागास सादर केला होता. मात्र, त्यातून विभागाने 2021-22 या वर्षासाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उद्योग विभागास उपलब्ध दिला आहे. ही रक्कम लवकरच वायनरींना प्राप्त होणार आहे.

Related Stories

No stories found.