मालेगाव शहराचा पाणीपुरवठा शुध्दच

अफवा पसरविण्यामागे विरोधकांचे षडयंत्र : शेख रशीद
मालेगाव शहराचा पाणीपुरवठा शुध्दच

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात Malegaon City गिरणा धरणातून Girna Dam शहरासाठी होत असलेला पाणीपुरवठा डबल फिल्टर Double Filter Water Suply असून नाशिकच्या प्रयोग शाळेत दररोज नमुने तपासले जातात. पाणीपुरवठा विभागातर्फे देखील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची ओटी तपासणी जागेवरच केली जाते.

इतर शहरांमध्ये पाणीटंचाई असतांना पुर्ण क्षमतेने व मुबलक पाणीपुरवठा मालेगावी होत असल्याने जनता आनंदी आहे. मात्र यामुळे विरोधक नाखुष असल्याने ते शहरात अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याची अफवा पसरवत आहे. यासाठी मनपाच्या एका निवृत्त अभियंत्याचा देखील सहभाग आहे. फक्त राजकीय व्देषातून विरोधकांतर्फे जनतेची दिशाभुल करण्यासाठी अफवा पसरवण्याचा उद्योग सुरू असल्याची टिका माजी आ. रशीद शेख Ex MLA. Rashid Sheikh यांनी येथे बोलतांना केली.

हजार खोली संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी शहरात गिरणा धरणातून होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे रोगराई पसरत असल्याच्या सुरू असलेल्या अफवांचे खंडन केले. राज्यात क्रमांक दोनचे जलशुध्दीकरण केंद्र मालेगावी आहे. तसेच गिरणा व चणकापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शुध्द व मुबलक पाणीपुरवठा मालेगावी होत असल्याने जनता गिरणा योजनेमुळे समाधानी आहे. हीच खरी पोटदुखी विरोधकांची असल्याने व त्यांना मनपातील निवृत्त अभियंत्याची साथ मिळाल्याने ही अफवा पसरवली जात असल्याचा आरोप शेख रशीद यांनी पुढे बोलतांना केला.

पाणीटंचाईने मालेगाव शहर होरपळून निघत असतांना आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात गिरणा धरण पाणीपुरवठा योजना पाठपुरावा करत आपण पुर्ण केली. धरणात मालेगावसाठी पाण्याचे आरक्षण देखील पुरेसे झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. गिरणा धरण योजनेच्या पुर्ततेसाठी विरोधकांनी कवडीचे कष्ट घेतलेले नाही. त्यामुळे योजनेच्या विरोधात अफवा पसरविण्यासाठी देखील त्यांना कष्ट होत नाही. काही डॉक्टरांना तर पाण्याची गुणवत्ता कळते. त्यांनी तरी शुध्द पाण्याविषयी पसरविल्या जात असलेल्या अफवांपासून दूर राहिले पाहिजे.

मात्र शहरासाठी काहीही चांगले काम न केलेल्या विरोधकांनी आता अफवेच्या माध्यमातून जनतेची दिशाभुल सुरू केली असल्याचा आरोप करत शेख रशीद पुढे म्हणाले, गिरणाचे जे पाणी मालेगावकर पित आहेत तेच चाळीसगाव, नांदगाव व संपुर्ण जळगाव जिल्हा पितो. त्यांना मात्र रोगराई होत नाही. मनपाकडे डबल फिल्टर प्लॅन्ट आहे. या ठिकाणी देखील पाण्याची गुणवत्ता दररोज तपासली जाते. तसेच पाण्याचे नमुने नाशिक येथे प्रयोगशाळेत देखील तपासणीसाठी दररोज पाठविले जातात. पाणी अशुध्द असल्याचा एकही अहवाल मनपास प्राप्त झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

चणकापूर धरणातून होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे मालेगावकरांची तहान भागत नव्हती. लोकसंख्या वाढीमुळे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले होते. या पार्श्वभूमीवर गिरणा धरण वाढीव पाणीपुरवठा पुर्णत्वास आणली गेली. गिरणा योजना राहिली नसती तर आज शहरवासियांचे मनमाडवासियांसारखेच हाल झाले असते. या वस्तुस्थितीची जाणीव जनतेस आहे. मात्र आपल्या विरोधकांना नसल्याने ते फक्त राजकीय व्देषातून अफवा पसरविण्याचा उद्योग करत असतात. त्यामुळे जनतेने अशा अफवांकडे लक्ष देवू नये, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.

पाण्याची दररोज तपासणी

मनपातर्फे शहरात होत असलेला पाणीपुरवठा शुध्द आहे. गिरणा-चणकापूर धरणातून जलशुध्दीकरण केंद्रात आलेल्या पाण्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे दररोज ओटी तपासणी जागेवरच केली जावून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे बघितले जाते. तसेच नाशिक प्रयोग शाळेत दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेच्या तज्ञांच्या निर्देशानुसारच जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याची तपासणी होते. पाणी अशुध्द अहवाल नाही त्यामुळे अफवांवर नागरीकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com