बाणगंगेमुळे पाणीप्रश्न मिटला

बाणगंगेमुळे पाणीप्रश्न मिटला

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

गंगापूर डाव्या कालव्यातून (Gangapur left canal) शेतीसाठी मे व जून महिन्याचे शेवटचे आवर्तन सुरू असून या आवर्तनातून ओझर (ozar) नजीक बाणगंगा नदी (Banganga river) मध्ये पाणी सोडण्यात (water discharge) आल्याने बाणगंगा नदीकाठावरील आठ गावातील पाणीप्रश्न तूर्तास मिटला आहे.

गंगापूर डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी (rabbi season) तीन तर फळबागांसाठी तीन असे सहा आवर्तने सोडली जातात. प्रत्येक आवर्तना वेळी बाणगंगा नदीला (Banganga river) पाणी सोडावे ही नदीकाठच्या गावांची मागणी असते. मात्र त्यातील तीन ते चार वेळेस बाणगंगेला पाणी सोडले जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतकर्‍यांना फायदा होतो. सध्या गंगापूर कालव्याचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात असून

या आवर्तनामुळे ओझर (ozar), बाणगंगा नगर, दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे आदी गावांना फायदा होतो. आमदार दिलीप बनकर यांच्या आदेशान्वये पाटबंधारे खात्याकडून हे पाणी सोडले गेले. पावसाळ्याच्या कालावधीत नदी प्रवाहित असते मात्र त्यानंतर नदीला पाणी कमी पडल्यानंतर पुन्हा आता कालव्याचे पाणी सोडल्याने बाणगंगा नदी खळखळून वाहू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com