लासलगावसह 'या' गावांचा पाणीप्रश्न सुटणार; कोटींचा निधी मंजूर

लासलगावसह 'या' गावांचा पाणीप्रश्न सुटणार; कोटींचा निधी मंजूर

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन (Jaljeevan mission) कार्यक्रमांतर्गत लासलगाव (lasalgaon) विंचूरसह (vinchur) 16 गाव नळपाणीपुरवठा योजनेस (Tap water supply scheme) सुधारित अंदाजपत्रकास 20 कोटी 10 लाख रु. निधी (fund) शासनाने मंजुर केला आहे.

लासलगाव विंचूरसह 16 गावांसाठी वरदान ठरलेल्या 16 गाव नळ पाणीपुरवठा योजनेला जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग (Retrofitting) अंतर्गत नुतनीकरणाच्या प्रस्तावास (Proposal for renewal) मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जानेवारी 2022 मध्ये मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी 17 कोटी 54 लाख रुपयांचा निधी (fund) देखील शासनाकडून मंजुर झाला होता. मात्र दर सूचित वाढ झाल्याने या योजनेसाठी अधिकच्या निधीची गरज होती. त्यानुसार या योजनेसाठी आता एकूण 20 कोटी 10 लाख रुपयांच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया (Tender process) राबविण्यात येवून योजनेच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार आहे. तसेच प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाचा (Solar energy project) देखील समावेश असल्याने योजनेच्या लाईटबिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्यात अधिक मदत होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून लासलगाव, विंचूरसह 16 गाव नळ पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात सन 2010 पासून कार्यान्वित करण्यात येवून सदर योजना सन 2012 साली संयुक्त पाणीपुरवठा समितीकडे (Water Supply Committee) देखभाल दुरुस्ती व योजना यशस्वीरित्या चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली होती.

सदरची योजना ही 16 गावांसाठी उपयुक्त ठरली आहे. परंतु आता या योजनेची पाईपलाईन जुनी झाल्याने तिला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे 16 गावांना पाणीपुरवठा करणे कठीण बनले आहे. त्यामुळे या योजनेच्या नुतनीकरणासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनास प्रस्ताव पाठवून त्यानुसार सदरची योजना मंजूर करून घेतली. 16 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा मुळ योजना सन 2031 पर्यंत एकूण संकल्पित 99 हजार 901 लोकसंख्येकरिता मंजूर करण्यात आली होती.

या योजनेच्या मुख्य दाब नलिकेसाठी 457 मी.मी पाईप वारण्यात आले आहेत. एकूण लांबीपैकी साधारण 5500 मी. पाईपलाईन जमिनी खालून टाकलेली असल्याने तिला ठिकठिकाणी गळती लागत आहे. त्यामुळे योजनेचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमामधील रेट्रोफिटिंग अंतर्गत पूरक पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे व त्याप्रमाणे अंदाजपत्रके व आराखडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाच्या (central government) जलजीवन मिशन (jaljeeval कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत वाढीव लासलगाव विंचूर व इतर 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली.

या योजनेअंतर्गत नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार या योजनेसाठी आता 20 कोटी 10 लाख रुपयांच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे. या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव विर, ब्राम्हणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर आदी गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.