मेटघरच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य

पाणी गुणवत्ता नियंत्रण विभागाचा अहवाल
मेटघरच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील मेटघर (Metghar) येथील महादरवाजा येथे असलेल्या विहिरीचे (Well) पाणी (Water) पिण्यायोग्य आहे, असा अहवाल पाणी गुणवत्ता नियंत्रण विभागाने दिला आहे...

यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली वणवण आणि महिलांना कोरड्या विहिरीत पाणी भरण्यासाठी उतरविण्याचा रचलेला डाव फसला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या विहिरीच्या पाण्याच्या नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत (laboratory) पाठविले असता, विहिरीचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर येथील महादरवाजा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन महिलांना 30 ते 35 फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून उतरावे लागत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे याची दखल जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) घेतली होती.या प्रकारानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासही सुरुवात झाली आहे.

काही राजकीय पुढार्‍यांनी हा गावाचा पाणीप्रश्न आहे, असे सांगत या घटनेचे भांडवल करत या मुद्याला वेगळा रंग देत प्रशासनासमोर एक वेगळेच चित्र रंगविले होते. या बाबींची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री, पर्यावरण मंत्र्यांनी प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. प्रत्यक्ष अधिकार्‍यांनी मेटघर येथे दिलेल्या भेटीअंती सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

त्यात मेटघर येथे तीन विहिरी असून, त्यातील दोन विहिरींना पाणी नसले तरी, ज्या विहिरीत महिला उतरून पाणी भरतात,असे दाखविण्यात आले. त्या विहिरीपासून पाचशे मीटर अंतरावर दुसरी विहीर असून, त्यात दहा ते बारा फूट पाणी असल्याचे आढळून आले होते. मात्र, ते पाणी पिण्यायोग्य नसल्याची दिशाभूल काही कथित पुढार्‍यांनी ग्रामस्थांची केली. त्यामुळे मुबलक पाणी असूनही प्रशासनाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला.

शिवाय काहींनी टंचाईशी तोंड देणार्‍या ग्रामस्थांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती याचे राजकीय भांडवलही झाले होते. कोरड्या विहिरीत महिलांना उतरावे लागते तसेच रात्रभर थेंबभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर थांबून राहावे लागत असल्याचे अतिरंजित चित्र रंगविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.