
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नामको बँकेच्या (Namco Bank) पुढाकारातून उभ्या राहिलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या (Namco Cancer Hospital) वाटचालीत रुग्णसेवेचे व्रत हे सहकार क्षेत्रासाठी निश्चितच आदर्शवत ठरणारे आहे.
हॉस्पिटलच्या नामको मेडिकल कॉलेजसाठी (Namco Medical College) आपण शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी दिली.
नामको हॉस्पिटलमधे कार्यरत लिनॅक रेडिएशन विभागाचे ’सौ. चंदाताई सुभाषचंद्रजी रुणवाल लिनॅक रेडीएशन सेंटर (Linac Radiation Center) तसेच, कॅन्सर बालरुग्ण विभागाचे ’स्व.श्रीरंग प्रशांत सोनजे कॅन्सर बालरुग्ण विभाग’ असे मान्यवरांच्या हस्ते नामकरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शनिवारी (दि. 14) नामको हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.भारती पवार बोलत होत्या.
व्यासपीठावर मुंबई (mumbai) येथील प्रसिद्ध उद्योजक सुभाषचंद्र रुणवाल (Entrepreneur Subhash Chandra Runwal) व चंदाताई रुणवाल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, नामको बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, संचालक अशोक सोनजे, ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सेक्रेटरी शशिकांत पारख, नामको बँकेचे पदाधिकारी तथा भाजप नेते विजय साने, हेमंत धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.भारती पवार म्हणाल्या की, देशात कॅन्सर व टीबीच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. त्यामुळे अशा धर्मादाय रुग्णालयांची आज आवश्यकता आहे. स्व. हुकूमचंद बागमार यांच्या दूरदृष्टीतून दोन दशकांपूर्वी हे रुग्णालय उभे राहिले. त्यामुळेच आज शेकडो रुग्णांना याचा लाभ होतो आहे. माझ्या परिवाराचे आणि नामकोचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे मी मुलीच्या नात्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करुन योजना,यंत्रणा आणि नामकोच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजसाठी निश्चितच प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
आर्थिक दुर्बल कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी पोर्टल तयार करावे, तसेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभाग लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशा सूचनाही नामदार डॉ. भारती पवार यांनी यावेळी केल्या. प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी रुग्णालयाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. समाजाचे आशीर्वाद व दानदात्यांच्या पाठिंब्यामुळेच ही वाटचाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सेक्रेटरी शशिकांत पारख यांनी विद्यमान वाटचालीसह भविष्यातील योजनांची व विस्ताराची माहिती दिली. रुग्णालयात लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लाण्ट, रक्तविकारांसाठी हिमॅटोलॉजी, हृदयविकारांसाठी कॅथलॅब कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नामको नर्सिंग कॉलेजमधील बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचा प्रस्ताव शासनदरबारी प्रस्तावित असून, तो मार्गी लावण्यासाठी डॉ. भारती पवारांनी सहकार्य करण्याची विनंती केली. या कार्यक्रमात अध्यक्ष वसंत गिते, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, दानदाते सुभाष रुणवाल, चंदाताई रुणवाल, अशोक सोनजे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
सोहळ्याला नामको बँकेचे पदाधिकारी कांतीलाल जैन, सुभाष लुनावत, महेंद्र बुरड, प्रशांत दिवे, रंजन ठाकरे, नरेंद्र पवार, तसेच नामको ट्रस्टचे पदाधिकारी आनंद बागमार, राहुल जैन देठिया, कांतीलाल पवार, बेबीलाल संचेती, सुरेश पाटील, रवींद्र गोठी, ललित मोदी, अरुणकुमार मुनोत, प्रितिष छाजेड, नंदलाल पारख, चंद्रकांत पारख, महेश लोढे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी जगदीश बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी तर आभार जयप्रकाश जातेगावकर यांनी मांनले