येवला उपजिल्हा रुग्णालयात लस संपली!

येवला उपजिल्हा रुग्णालयात लस संपली!
लस

येवला। Yeola (प्रतिनिधी)

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतला असताना आता लसीची टंचाई जाणवू लागले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीचा साठा शनिवारी संपला आहे.

तर ग्रामीण भागातील साठाही सोमवारी संपला आहे. उपजिल्हा रुग्णालयात बुधवार, शुक्रवार व शनिवार लसीकरण केले जाते. त्यामुळे येथे बुधवारपर्यंत लस उपलब्ध होते की नाही. याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे.

राज्यात लस टंचाई निर्माण झाली असून, यावरून केंद्र व राज्य सरकारचे तू तू - मै मै सुरू आहे. त्यातच सध्याला लस उपलब्ध नसल्याने लसीकरण हळू ठप्प होऊ लागले आहे.

शनिवारी दुपारनंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण बंद झाले. येथे आतापर्यंत अडीच हजारावर नागरिकांनी लस घेतली आहे. अजूनही रोज उपजिल्हा रुग्णालयात रांगा लागत असून, अनेक जण प्रतीक्षेत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने, रांगा लागल्या होत्या.

दुपारपर्यंत येथील लसीकरण चालताना नंतर लसीचा साठा संपल्याने रांगा लावून असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. करोना लसीचा साठा संपल्याने आता लस केव्हा उपलब्ध होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात पाटोदा, मुखेड, भारम, अंदरसुल, सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व येवला उपजिल्हा रुग्णालयात शासकीय लसीकरण केंद्रावर करोना लसीकरण करण्याची सुविधा आहे.

या सहा लसीकरण केंद्रासाठी 14 हजार 440 लसींची डोस आले होते, ंशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकाडे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com