शहराची एकता महत्त्वाची : कृषीमंत्री भुसे

पोलीस दलाच्या एकता दौडला प्रतिसाद
शहराची एकता महत्त्वाची : कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

ज्या शहरात जातीय एकता व शांतता कायम टिकून unity of the city असते ते शहर निश्चित प्रगतीच्या दिशेने पुढे जाते. गत दोन दशकांपासून मालेगावी असलेल्या जातीय एकतेमुळेच शहराचा विकास होत आहे. ही एकता भविष्यातदेखील टिकून राहील यासाठी समस्त मालेगावकरांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी येथे बोलताना केले.

पोलीस स्मृती सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनाच्या Police Memorial Week and National Unity Day पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ. पो. अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या संकल्पनेतून आज ग्रामीण पोलीस दलातर्फे येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. करोना नियमांचे पालन करत येथील पोलीस कवायत मैदानातून सकाळी एकता दौडला प्रारंभ झाला.

कॅम्परोड, मोसमपूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, किदवाईरोड, पेरी चौक, सरदार चौक, जामा मशिद, रामसेतू पूल, संगमेश्वर, सटाणारोडमार्गे पुन्हा कॉलेज मैदान अशा सुमारे पाच कि.मी.चा मार्ग एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या 300 स्पर्धकांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. या एकता दौडमध्ये करोना नियमांचे पालन करण्यात आले. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्याच स्पर्धकांना या एकता दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

एकता दौडची सांगता विजेत्या व सहभागी स्पर्धकांना पारितोषिके देऊन केली गेली. यावेळी कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते आकाश अहिरे, जयेश दळवी, तुषार वाघ, अभिजित निकम, हितीन कुमार तसेच महिलांमध्ये श्रद्धा नंदू पवार, वैशाली दीपक शेलार, सर्वज्ञा नंदू पवार, सोनाली विनोद शेलार, दीपाली सुमराव या विजेत्या महिला स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

यावेळी ग्रामीण पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेल्या एकता दौड उपक्रमाचे कृषिमंत्री भुसे यांनी कौतुक करत दिवंगत पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन केले.

शहरात कायदा सुव्यवस्थेसह शांतता टिकून राहण्यासाठी पोलीस दलाचे योगदान सदैव महत्वपुर्ण राहिले आहे. जातीय एकता कायम राहावी यास्तव सतत वेगवेगळे उपक्रम पोलीस अधिकार्‍यांतर्फे राबविले जातात.

या उपक्रमांना जनतेचे सहकार्य मिळत असल्याबद्दल भुसे यांनी शेवटी समाधान व्यक्त केले. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, अप्पर जिल्हाधिकारी पाटोळे, प्रांत विजयानंद शर्मा, पो. उपअधिक्षक लता दोंदे, पुष्कराज सूर्यवंशी, पो.नि. गाढे, गायकवाड, रत्नपारखी, भदाने, देवरे, धुसर, थोरात, भोये, पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com