रेल्वेचा अंडरपास झाला तलाव

रेल्वेचा अंडरपास झाला तलाव

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील फर्जंद बागेलगत असलेल्या रेल्वे पुलाखाली साचणारे पाणी रेल्वे पुलाला (Railway bridge) धोकादायक असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Cantonment Board) याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या (Central Railway) भुसावळ ते मुंबई या दरम्यानच्या मार्गावरील देवळाली भगूर स्टेशनच्या (Bhagur Station) मध्यवर्ती असलेल्या फर्जंदची बागेजवळ पुलाखाली पाणी साचत असल्याने पुलाचा पाया कमकुवत होऊ लागला आहे.

५० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटल्याने या पुलाची भक्कम तटबंदी कमकुवत होऊ पाहत असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय कॅन्टोन्मेंट हद्दीतून या पुलाखाली येणारे सांडपाणी साचत असल्याने ते धोकादायक ठरू पाहत आहे.

देवळाली रेल्वे स्टेशन (Deolali Railway Station) जवळ ब्रिटिशांनी उभारलेला शंभर वर्षांपूर्वीचा फुल त्याची डागडुजी प्रशासनाने केली आहे. मात्र त्यानंतर बाकी जवळच्या पुलाची निर्मिती झाली. पूर्वी या पुलाखालून देवळाली ते सिन्नर असा बस वाहतुकीचा मार्ग होता.

मोठी वाहनेदेखील या पुलाखालून ये-जा करत असत. कालांतराने रेल्वे प्रशासनाने ही वाहतूक बंद करत छोट्या गाड्यांसाठी येथून वाहतूक सुरू ठेवली आहे, मात्र पुलाखाली येणारे सांडपाणी व पावसाचे पाणी त्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने साचणारे पाणी पुलाला कमकुवत बनत आहे.

याबाबत नानेगाव ग्रामस्थांनी (Nanegoan Villagers) रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असता फक्त पाहणी करण्यात आली, मात्र त्याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आजही पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे.

खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनीदेखील याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचित केले असून त्यांनीदेखील तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष मीना करंजकर यांनीही याबाबत बोर्ड प्रशासनाला पत्र देऊन पुलाखाली साचणारे पाणी काढून देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

तात्पुरते पाणी काढून दिले जात असते तरी कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने पुलाचा कमकुवतपणा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मोठी अप्रिय घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com