दुचाकीची कंटेनरला मागून धडक; दोन गंभीर

दुचाकीची कंटेनरला मागून धडक; दोन गंभीर

बेळगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे | Belgaon Kurhe

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) शेवाळ विहीर भागाजवळ वाडीवऱ्हेकडून (Wadivarhe) नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने अपघातात (Accident) दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले...

अधिक माहिती अशी की, दशरथ भीमाजी शेजवळ (Dashrath Shejwal) (३५) व हिरामण वामन पालवे (Hiraman Palve) (37) हे दोघे वाडीवऱ्हेकडून नाशिककडे एम. एच. १५ डीजी ९५४० या क्रमांकाच्या मोटारसायकलने जात होते.

शेवाळ विहीर भागाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारसायकलीने मागून धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील-गुंड यांना माहिती मिळताच त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने जखमींचे प्राण वाचले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com