फसवणूक करणारे दोघे भामटे पोलिसांच्या ताब्यात

फसवणूक करणारे दोघे भामटे पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

एटीएम ATM मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करून एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांची फसवणूक करणार्‍या पर राज्यातील दोन भामट्यांना उपनगर पोलिसांनी Upnagar Police धुळे येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

दत्त मंदिर रोड वरील शंकर आगलावे हे जेष्ठ नागरिक 29 /10/2021 रोजी दुर्गा मंदिरा समोरील स्टेट बँकेत एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. आगलावे पैसे काढत असताना दोन भामट्यांनी त्याचा पिन नंबर बघितला आणि लबाडीने, भामटेगिरी करत त्यांच्या कार्डची अदलाबदल केली. व काही वेळात आगलावे यांच्या खात्यातून32 हजार काढून घेतले. या प्रकरणी उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या भामट्याचा तपास सुरू असताना हे भामटे धुळे येथे असल्याचे समजताच गुन्हे शोध पथकाचे सपोनि राकेश भामरे, पोलीस अंमलदार प्रभाकर बोडके, अमोल टिळेकर, नासिर शेख,जयंत शिंदे यांनी धुळे शहर पोलिसांची मदत घेऊन विजयकुमार पालाराम राजपूत (वय 35), सुनीलकुमार धुपसिंग राजपूत (वय 32) प्रशांत कॉलनी, हिसर हरियाणा यांना ताब्यात घेतले.त्याना विश्वासात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.न्यायालायत त्यांना हजर केले असता त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com