अभोणा रस्त्यावरील झाडे धोकेदायक स्थितीत

अभोणा रस्त्यावरील झाडे धोकेदायक स्थितीत

अभोणा। वार्ताहर Abhona-Kalwan

कळवण (Kalwan) रस्त्यावरील अभोणा (Abhona Village) गावापासून जवळपास एक कि.मी. अंतरावर हॉटेल आप्पाश्री जवळील रस्त्यावर गुलमोहराचे झाड पडण्याची स्थितीत असून याकडे अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने झाड अचानक पडले तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यांवर रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना (Vehicle owners) त्रास सहन करावा लागत आहे. या झुडपांमुळे रस्त्यावर अपघाताचे (Accident) प्रमाणही वाढले आहे. कळवण तालुक्यात (Kalwan Taluka) गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे आसोली ते पाळेसह नांदुरी -अभोणा असे अनेक रस्त्यांच्याकडेला वेगवेगळ्या जातीचे गवत व काटेरी झुडपे वाढली आहेत. या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहे.

काही ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. रस्त्याचा कडेला वाढलेल्या झुडपांमुळे रस्ता अधिक अरुंद झाला आहे. एकावेळी दोन वाहने समोरासमोर असल्यास या झुडपांचा फटका वाहन धारकांना बसत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये वादविवाद होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) व जिल्हा परिषद बांधकाम विभाग (Zilla Parishad Construction Department) यांनी तात्काळ हि काटेरी झुडपे काढून टाकावी व वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील वाहनधारकांनी केली आहे.

अभोणा - कळवण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था होत आहे. त्यात रस्त्यालगतच्या धोकेदायक वृक्ष, गवत झाडे काटेरी झुडपांमुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. हे झुडपे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. बांधकाम खात्याने या झुडपे तात्काळ काढावेत.

- सुनील खैरणार, सामाजिक कार्यकर्ते, अभोणा

Related Stories

No stories found.