परंंपरागत राजकीय विरोधक आमने-सामने

परंंपरागत राजकीय विरोधक आमने-सामने

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंंघाच्या (Nashik Division Graduate Constituency) निवडणुकीचा (election) बिगुल वाजला आहे. गेल्या बारा वर्षांपूर्वी भाजपचा (BJP) बालेकिल्ला ताब्यात घेणार्‍या कांँग्रेसला (congress) गेल्या निवडणुकीपासून सुरुंंग लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) कार्यकर्ते करत आहे.

अद्याप त्यांंना यश आले नाही. यंदाच्या निवडणुकीत (election) काट्याने काटा काढण्यासाठी नगर जिल्ह्यातील परंंपरागत राजकीय विरोधक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याविरुध्द विद्यमान महसूल मंंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या निकटवर्तीयांना आमने सामने उभे करुन बालेकिल्ला पुन्हा सर करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरु झाला आहे. त्याला पदवीधर मतदार कितपत साथ देतात, हे नववर्षात कळणार आहे. मात्र दिग्गज उभे राहिल्यास ही निवडणूक कमालीची लक्ष्यवेधी होणार, हे निश्चित आहे.

राजकारणात (politics) कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते. मात्र विखे-थोरात त्याला अपवाद ठरले आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसेच शक्तिशाली सिध्द झाले आहे. पूर्वी दोघे एकाच पक्षात असूनही विरोधी पक्षासारखे वागतांना दिसत होते. आता राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री (Minister of Revenue) आहेत. आता दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानें नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही मातब्बर आमने-सामने ठाकणार असल्याचे चित्र दिसत आहे. दोघांच्याही नेतृत्वाचा कस लावणारी ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधणारी ठरेल यात शंकाच नाही. त्यामुळे कधी नव्हे एवढी लक्षवेधी निवडणूक यंदा पदवीधर मतदारसंघाची होणार आहे.

बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी सन 2010 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर तीन निवडणुकांतून या मतदारसंघात विजय मिळवला आहे. आता चौथ्यांंदा ते नशीब अजामवत आहेत. यंदा त्यांच्या पाठिशी महाविकास आघाडी आहे. तर भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे दंड थोपटून सज्ज झाले आहेत. धुळ्यातील शिक्षण संस्थाचालक धनराज विसपुते यांच्याही नावाची चर्चा भाजपतर्फे होत असली तरी विखे यांचे वर्चस्व पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याचीच दाट शक्यता व्यक्त होत आहे.

भाजप परिवारातीलच संघटना असलेली शिक्षक परिषद यंदा काय भूमिका घेते, यावर भाजप उमदेरवाराचे भवितव्य अवलंबून आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षक परिषदेने दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर होणे लांबल्याची चर्चा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने आ. थोरातांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मंत्री विखे यांच्यावर जबाबदारी सोपवत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखेंच्या ‘प्रवरे’ची यंत्रणा मतदार नोंदणीसाठी सक्रिय झाली.

नगर जिल्ह्यात काँग्रेसी नेत्यांच्या हाती शैक्षणिक संस्थांचे विस्तृत जाळे आहे. शिवाय डॉ. तांबेंना मागील दोन निवडणुकींचा दांडगा अनुभव आहे. मितभाषी स्वभाव, पाचही जिल्ह्यांत राखलेला जनसंंपर्क, त्याआधारे उभारलेली सक्षम प्रचार यंत्रणा ही त्यांची जमेची बाजू आहे. पाच जिल्ह्यांत प्रचार यंत्रणा उभी करता न येणे, जळगावमधील खडसे-महाजन गटातील सुप्त संघर्ष यामुळे केंद्र व राज्यात सत्तेची संपूर्ण ताकद पणाला लावूनही नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपला दारुण पराभवाची चव चाखावी लागली.

यंदा परिस्थिती तीच असली तरी भाजप व शिंदे गट कितपत काम करतो, यावर विखेंंंचा कस लागणार आहे. या निवडणुकीत मनसेना, कम्युनिस्ट फारसे अस्तित्व दाखवत नाही. दोघा दिग्गजांमध्ये आपलेही नशीब अजमवण्यासाठी धुळ्याच्या शुभांगी पाटील रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मतांच्या विभाजनासाठी आणखी किती उमेदवार उभे करतील, हे लवकरच दिसणार आहे. मात्र यंदाची निवडणूक लक्ष्यवेधी ठरणार, हे पक्के आहे.

पदवीधरसाठी सहा आमदार

राज्यातील पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी राज्यात सहा आमदार निवडून दिले जातात. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता येत नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून केवळ पदवीधर किंवा समकक्ष पात्रता असलेला व्यक्तीच मतदान करू शकतो.

विधानपरिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एक बारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर असलेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण 72 सदस्य आहेत. त्यापैकी 6 सदस्य पदवीधर मतदारसंघातून येतात. त्यात डॉ. तांबे यांचा समावेश सध्या आहे. ते सात फेब्रुवारीपर्यंत आमदार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com