बालसाहित्य मेळाव्याची परंपरा सुरूच राहील : भुजबळ

बालसाहित्य मेळाव्याची परंपरा सुरूच राहील : भुजबळ

नाशिक / कुसुमाग्रजनगरी । टीम देशदूत Nashik

93 व्या मराठी साहित्य संमेलनात (93rd Marathi Sahitya Sammelan) जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण यंदाच्या साहित्य संमेलनात राबवत आहोत.साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला आहे.

बालसाहित्य मेळाव्याची ही परंपरा यापुढील साहित्य संमेलनात देखील कायम राहील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection), नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Nashik District) तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष (receptionist of the meeting) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.

भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City) आडगाव (Adgaon) नाशिक (nashik) येथे सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Veteran actor Dilip Prabhavalkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City) आडगाव (Adgaon) नाशिक (nashik) येथे सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Veteran actor Dilip Prabhavalkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बाल साहित्य मेळाव्याची सुरूवात बाल साहित्य पूजनाने करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी (milind joshi), जयप्रकाश जातेगावकर (Jaiprakash Jategaonkar), समीर भुजबळ (Sameer Bhujbal), पंकज भुजबळ (pankaj bhujbal), विश्वास ठाकूर (vishwas thakur), प्रा.डॉ.शंकर बोर्‍हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील, संतोष हुदलीकर, संजय करंजकर, विशाखा भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, इतिहासात प्रथमतः साहित्य संमेलनात बालकुमार मेळाव्यात चित्रकलेसह विविध कलांना स्थान दिले आहे. मुलांमध्ये बालपणापासूनच साहित्याची आवड निर्माण व्हावी हा या बाल मेळाव्याचा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगत बालसाहित्य मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद बघता यापुढील होणार्‍या साहित्य संमेलनात देखील बाल साहित्य मेळाव्याचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला. बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. तसेच बालकुमार साहित्य मेळाव्यात हजर राहण्याची संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण यावेळी केले. याला बालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मेळाव्यात बाल चित्रकारांनी सुंदर चित्रे रेखाटली.या बाल मेळाव्यात 3 वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता 5 वीत शिकणारा मयुरेश आढाव या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

वाचलेले साहित्य लिहायला प्रेरणा देते : प्रभावळकर

यावेळी अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणाले की, आजकालची मुलें अधिक स्मार्ट झाली आहेत. प्रत्येकात कुठलीना कुठली कला असते ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी. यामध्ये पालकांनी देखील विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाचलेलें साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत, साहित्याची साथ सोडू नये असे सांगत दररोज तीनचार ओळींचे लिखाण करत पुस्तकाची तीन- चार पाने दररोज वाचावी असे आवाहन त्यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com