दिवाळी मेळावाच्या खेळणी अजून मैदानावरच

बालकांची कूचंबणा, अधिकार्‍यांचा काना डोळा
न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

मनपाच्या जागेच्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही आपले खेळणी साहीत्य (Toy literature) मैदानातच (ground) ठेवत युवकांची अडचण निर्माण केली जात आहे. सोबतच मनपाचा महसूल (revenue) बुडविला जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सर्वसामान्यांवर घरपट्टी (house tax), पाणी पट्टी (water tax) थकताच ढोल बडवत वसूली करणार्‍या किंबहुना किरकोळ अतिक्रमण (Encroachment) करणार्‍या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या मनपा अधिकार्‍यांची या मेळावा धारकावर विशेष मेहेरनजर अस्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सातपूर कॉलनी (Satpur Colony) येथील मनपाच्या जिजामाता विद्यालयातील मोकळ्या पटांगणात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी आयोजित मेळाव्यासाठी मनपाच्या मिळकत विभागाने मेळावा धारकाकडून 89 हजार रुपये भाडे आकारणी केली आहे. दरम्यान, 10 नोव्हेंबरला मेळाव्याचा कालावधी संपल्यानंतरही मेळावा धारकाने आपले बस्थान त्याच जागेवर मांडले आहे. सर्वात कडी म्हणजे सुमारे तेरा दिवसांचा कालावधी उलटूनही मनपा अधिकार्‍यांचे याकडे अजिबात लक्ष नाही ही दूर्दैवी बाब आहे. याखेळण्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह (students) परिसरातील क्रिकेटसह (Cricket) विविध खेळांसाठी मुलांची मोठी अडचण झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com