...तुला कायमचा गांधीजींकडे पाठवतो; काँग्रेस कमिटीत धमकीच्या पत्राने खळबळ

...तुला कायमचा गांधीजींकडे पाठवतो; काँग्रेस कमिटीत धमकीच्या पत्राने खळबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर (Dr. Vasant Thakur) यांना जीवानिशी मारण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे...

'तुला कायमचा गांधीजींकडे पाठवतो, तुला लई गांधी लागतात ना, मग कायमचा जा गांधींकडे' असा आशय पत्रात आहे. दरम्यान, या प्रकरणी डॉ. वसंत ठाकूर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) तक्रार दाखल केली आहे.

या पत्राने काँग्रेस कमिटीत (Congress Committee) एकच खळबळ उडाली आहे. एमजी रोड येथील काँग्रेस कमिटीच्या पत्त्यावर हे निनावी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात आक्षेपार्ह मजकूर आहे.

त्यात म्हटले आहे की, 'संत कालिचरण महाराजांविरोधात (Kalicharan Maharaj) तक्रार देताना तुला लाज वाटली नाही का? तू स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ नको. थांब तुला गांधीजींकडे पाठवतो. तू कायमचा गांधींकडे जा' असा मजकूर असून, हिंदू असा शब्द लिहिला आहे. या प्रकरणाने काँग्रेस कमिटीत खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com