अभिनेता धर्मेंद्रची मालेगावात शाळा; तिसऱ्यांदा होतेय चौकशी

अभिनेता धर्मेंद्रची मालेगावात शाळा; तिसऱ्यांदा होतेय चौकशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रसिध्द हिंदी सिनेअभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी मालेगाव (Malegaon) तालुक्यातील टोकडे (Tokade) येथे १९८० मध्ये त्यांच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या श्रीमती सत्यवती कौर विद्यालयाची (Satyawati Kaur Vidyalaya) तिसऱ्यांदा शिक्षण विभागाकडून (Education Department) चौकशी (Inquiry) सुरू झाली आहे...

विद्यालयात बेकायदेशीर शिक्षक भरती, भ्रष्टाचार, सेवकांवरील अन्यायाविषयी येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. त्याआधारे यापूर्वी दोन वेळा चौकशीसाठी अधिकारी जाऊनही चौकशी अधिकाऱ्यांना मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही.

तसेच शाळेतील उपशिक्षक समाधान निमडे यांना शाळेत रुजू करुन घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले. मात्र, संस्थेने या शिक्षकास हजर करुन घेतले नाही.

चौकशी समितीने शाळेस भेट दिल्यानंतर त्यांनी अभिलेखे मागितले असता लिपिक सेवानिवृत्त झाले असून त्यांचा पदभार अद्याप कुणाकडेही सोपवलेला नसल्यामुळे अभिलेखे मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय पाठयपुस्तक वाटपात अपुर्तता आढळली. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अपूर्ण आढळले. विशेष बाब म्हणजे शिक्षकांच्या नेमणुकांसदर्भात बऱ्याच बाबी शिक्षण विभागाच्या अनाकलनीय आढळल्या आहेत.

संस्थेचे कार्यकारी मंडळ व शिक्षक एकमेकांचे नातेवाईकच आहेत. यांसह इतर तक्रारींच्या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र सानप यांनी त्रयस्थ संस्थेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com