कृपा परदेशी
कृपा परदेशी
नाशिक

दृष्टिहीन 'कृपा' ठरली नाशकात पहिली

दहावीत अंधामध्ये प्रथम

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

दहावी म्हटली कि, विद्यार्थ्यांसह पालकांनाही काळजी पडते. अशातच नाशिक मधील कृपा परदेशी या जन्मतः अंध विध्यार्थीने स्वतःचे छंद जपत ९३.२० टक्के गुण मिळवून अंधांमध्ये पहिली आली आहे.

दिवसरात्र मेहनत घेत आईच्या सहकार्याने तिने हे यश संपादन केले. प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचे तिचे स्वप्न आहे.

स्वतःच्या समोर असलेली आव्हाने पार करत दिव्यांग कृपा परदेशी हि सारडा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ब्रेल लिपीतील पुस्तके जवळपास सहा महिने उपलब्ध नसतानाही तिने हे यश संपादन केले. ९० टक्क्यांपुढेच गुण मिळवायचे हे ध्येय ठेवून तिने अभ्यास केला.

कृपा परदेशी हि उत्कृष्ट गायिका व सर्व प्रकारचे वाद्य वाजवण्यात तिला हातखंड आहे. तिला यावर चार विशेष प्राविण्य मिळाले आहे. येत्या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत भरती व्हायचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com