पोषण आहारासाठी लवकरच निविदा

पोषण आहारासाठी लवकरच निविदा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिका शाळा ( NMC Schools ) लवकरच सुरू होणार असून शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार (School nutrition diet ) मिळावा यासाठी मध्यान्न भोजन योजनेंतर्गत कार्यवाही सुरू झाली असून यासाठी मनपाच्या शिक्षण विभागाच्या (Corporation's education department) वतीने नविन निविदा प्रक्रिया (Tender process)राबविली जाणार आहे.

करोना काळात विद्यार्थ्यांना शाळेत अन्न शिजवून वाटणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना शाळेतील कोरडे अन्न मिळायचे परंतु आता प्राथमिक शिक्षण संचालक यांनी महाराष्ट्रात 15 मार्च 2022 पासून प्रत्यक्ष शाळेत अन्न शिजवून देण्याबाबत पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे आता मुलांना दुपारचे शाळेतील ताजे जेवण उपलब्ध होऊ शकणार आहे.

दिनांक 28 फेब्रुवारी2022 च्या शिक्षण संचालक यांचे पत्रानुसार 15 मार्च 22 पासून शालेय पोषण आहार अंतर्गत अन्न शिजवून वाटण्यासाठी परिपत्रक शासन आदेश देण्यात आला आहे. या शासन आदेशानुसार करोना महामारीच्या संदर्भाने आणि काही सूचना देखील अन्न शिजवून देणार्‍या यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना देखील शिक्षण संचालक यांनी केली आहे. आणि या सूचनांचे पालन करूनच शाळेत शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान्न भोजन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृहाची योजन राबविली जाणार आहे. मनपा शाळांतील सुमारे 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. यासाठी येत्या काही दिवसात यासाठी निविदा प्रक्रीया राबविली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com