आदिवासींना आवरेना मोहफुले वेचण्याचा मोह

आदिवासींना आवरेना मोहफुले वेचण्याचा मोह

हरसूल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), सुरगाणा (surgana) या तालुक्यातील आदिवासी भागात (tribal area) मोहफुलें गळण्यास सुरुवात झाल्याने आदिवासी बांधवांची (tribal community) मोहफुलें वेचण्यासाठी लगबग दिसून येत आहे. यामुळे अबालवृद्धासह शालेय विद्यार्थ्यांना (students) मोहफुलें वेचण्याचा मोह आवरता येत नसल्याने चेहर्‍यावर आनंदाच्या छटा बघावयास मिळत आहेत.

त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रमाणावर आजही जंगले पहावयास मिळत आहे. या जंगलामध्ये काही प्रमाणात मोहाची झाडे आहे तर काही मालकीच्या स्वरूपात आहेत. तालुक्यांनी आजही वनसंपत्तीचा मोठा ठेवा ठेवला आहे. वनशेती म्हणून मोहफुलांना ओळखल्या जाणार्‍या मोहफुलांनी मात्र ग्रामस्थांना भुरळ घातली जात आहे. सद्यस्थितीत मोहफुलांना बहर आला असून मोहफुले गळण्यास सुरुवात झाली आहे.

ही फुले वेचण्यासाठी ग्रामस्थ रात्रीच्या वेळेसही झाडाखाली मुक्काम ठोकत आहे. यामुळे ही मोहफुलें आदिवासी बांधावासाठी रोजगार (employment) तसेच कुटुंबाला आर्थिक उलाढाल करणारी ठरत आहे. गेल्या वर्षी करोना (corona) काळातील लॉकडाऊनने (Lockdown) या मोहफुले वेचण्यावर विपरीत परिणाम झाला होता, मात्र यावर्षी करोना नसल्याने ग्रामीण भागातही व्यवहार सद्यस्थितीत सुरळीत असल्याने मोहफुलांना बर्‍यापैकी मागणी आणि बाजारात उलाढाल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com