सप्तशृंगी मातेच्या अभिषेकाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

सप्तशृंगी मातेच्या अभिषेकाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीच्या अभिषेकाबाबत प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढण्यात आला. त्यानंतर आता दररोज होणारा पंचामृत अभिषेक श्री भगवती मूर्तीवर होणार नसून देणगीदार भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीवर होणार आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे....

भगवतीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा काही इजा होऊ नये किंवा त्यात बदल होऊ नये, वर्षानुवर्ष भाविकांना भगवतीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन व्हावे म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता यापुढे पंचामृत अभिषेक चांदीच्या मूर्तीवर होईल. ही मूर्ती सुमारे २५ किलोची आहे. पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

दररोज भगवतीच्या मूर्तीवर जो अभिषेक केला जातो त्यात पाणी, दूध, लोणी, मध, साखर, नारळपाणी आणि तुपाचा वापर केला जात असायचा. मात्र आता चांदी धातूच्या मूर्तीवर पंचामृत महापूजा करण्यात येईल.

सप्तशृंगी मातेच्या अभिषेकाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

धार्मिक मार्गदर्शनाखाली, ऐतिहासिक संदर्भ तपासून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २६ सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेपासून सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असून भगवतीच्या उत्सव मूर्तीवर म्हणजेच चांदी धातूच्या मूर्तीवारच अभिषेक करण्यात येईल अशी देखील माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे..

दरम्यान, सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धन आणि देखभाल प्रक्रियेनंतर ११ हजार किलो शेंदूर मातेच्या मूर्तीवरून काढण्यात आला. त्यानंतर वर्षानुवर्ष डोळ्यात भरलेले सप्तशृंगी मातेचे मूळ रूप पाहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com