शासनाविरोधात घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणला

शासनाविरोधात घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणला

नांदगाव । प्रतिनिधी Nashik

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आलाच पाहिजे... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो..., ईडी सरकार हाय हाय.., आदि घोषणा देत तहसिल परिसर दणाणुन गेला होता.

वेदांता - फॉक्सकॉन उद्योगामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र सदर प्रकल्प गुजरात गेल्याने त्याचा निषेध म्हणुन येथील नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रात सुरू होणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प येथिल तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणारा होता मात्र सरकार बदलताच सदर प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आले. तो पुन्हा महाराष्ट्रात आणुन येथिल तरूणांना त्या माध्यमाव्दारे रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढले असून शेती पिकांचे नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व शेतकर्‍यांना 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने मदत द्यावी,

लम्पी आजारामुळे शेतकर्‍यांची जनावरे मरत असून त्यांना सरकारने त्वरीत भरपाई द्यावी. तसेच या आजाराची लस सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून द्यावे, जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे व पावसाळ्यातील कामे बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या सर्व कामांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व त्वरित पालकमंत्री नियुक्ती करून नाशिक : जिल्ह्यातील सार्वजनिक कामांना सुरुवात करावी तसेच 2021 मधील अतिवृष्टी झालेल्या काही शेतकर्‍यांना पिकांची भरपाई अद्यापही मिळालेली नाही ती मिळावी व दरम्यानच्या काळात शेतकर्‍यांचे बरेच पशुधन मृत्यूमुखी पडले होते, त्यांची पंचनामे झाले होते परंतु अद्याप पर्यंत भरपाई मिळाली नाही, विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सरसकट लाभ मिळावा आदि मागण्या निवेदनात नमुद करण्यात आले आहेत.

यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, वाल्मिक जगताप, योगिता पाटील, सोपान पवार, नानासाहेब शिंदे आदिंनी मनोगत व्यक्त करित वेदांता फॉक्सकॉन गुजराथला नेल्याचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, डॉ.वाय.पी.जाधव, शहराध्यक्ष गौतम जगताप, नानासाहेब शिंदे, दिपक खैरनार, प्रसाद पाटिल, हबीबभाई शेख, जगताप सर, राजेंद्र जाधव, दतूभाऊ पवार, विश्वास आहिरे, शिवा माळी, योगिता पाटिल, सुगंधा खैरनार, अलकाताई आयनोर, चंद्रकला बोरसे, कविता द राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष दया जुन्नरे, राजु लाठे, आनंद बोथरा, काका सोळसे, बाळासाहेब देहाडराय आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com