अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन मागे
नाशिक

अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन मागे

आमदार किशोर दराडेंची मध्यस्थी

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी ज्या शाळांना अनुदान नाही त्यांना 20 टक्के अनुदान तर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे त्यांना 40 टक्के अनुदान देणार,अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याबरोबरच प्रचलीत 15 नोव्हेंबर 2011 चा निर्णय कॅबिनेटवर मान्यतेसाठी ठेवणार, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.यानंतर औरंगाबाद येथील शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले.आंदोलकांना ना. गायकवाड यांनी साखरपाणी दिले.

वरील मागण्यांसाठी औरंगाबाद येथून नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैर, अनिस कुरेश यांच्यासह चार शिक्षक शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन पुकारून मंत्रालयाकडे निघाले होते.मंगळवारी(दि.१२) आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आंदोलनाची दुसऱ्यांदा दखल घेऊन नाशिक येथून या आंदोलकांना आपल्या वाहनाने मुंबईत नामदार गायकवाड यांच्या दालनात घेऊन गेले .

तेथे झालेल्या चर्चेनंतर नामदार गायकवाड यांनी वरील आश्वासन दिल्यानंतर या आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.यावेळी आमदार किशोर दराडे,आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे , आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांकडे मागणी-आ.दराडे आंदोलक शिक्षक हे येवला येथे आले असता आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच खासदार अनिल देसाई यांच्याकडे आंदोलन सोडण्याबाबत व निर्णय घेण्याबाबत व्हीसी मार्फत मागणी केली होती.

यावेळी शिक्षकांच्या मागण्या मांडताना पंधरा वर्षापासून अनेक शिक्षकांना वेतन नाही. सध्या करॉनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असून शिक्षकांनी विशेषता येवला व मालेगाव येथील शिक्षकांनी हा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे .याचीही दखल घ्यावी व त्यांना वेतन सुरू करावे.शाळांना अनुदान द्यावे, अशी मागणी केली होती. येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जमाफी केल्यामुळे शेतकरी वर्ग आपल्या सरकारवर खूषआहे.

मात्र, शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांची नाराजी आहे. त्यामुळे शिक्षकांची नाराजी दूर करावी, अशी मागणी आपण खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळेच आज हा निर्णय झाल्याचे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com