'या' दोन दिवशीही कर भरणा केंद्र राहणार सुरु

'या' दोन दिवशीही कर भरणा केंद्र राहणार सुरु

नाशिक | प्रतिनिधी Nashik

29 एप्रिल आणि 30 एप्रिलला मनपाचे भरणा केंद्र /नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार, सुट्टीच्या दिवशी नागरिकांना कर भरता येणार सन 2023-2024 चे मालमत्ता कर व पाणीपट्टी विभागाचे वसुली इष्टांक पूर्ण करणेकरीता विविध प्रकारच्या उपाययोजना राबविणेत येत आहे.

एप्रिल महिन्यात 8 टक्के मालमत्ता करात सुट,सवलत तसेच ऑनलाईन करीता सर्वसाधारण करात 5 टक्के सवलत लागु करण्यात आलेली आहे. सध्या इंटरनेट सेवेमध्ये वेळोवेळी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रावर मालमत्ता कर भरण्याकरीता, करदात्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे 29 एप्रिल आणि दि. 30एप्रिल या सुट्टीच्या दिवशी भरणा केंद्र सुरु ठेवणे अनिवार्य आहे. त्यानुसार सदर दोन दिवशी मनपाचे विभागीय कार्यालय, उपकार्यालयातील सर्व भरणा केंद्र नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यास मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मान्यता दिली आहे. सर्व विभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु रहातील याची दक्षता घ्यावी, अशी सुचना देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com