निलंबनाची कारवाई रद्द करावी

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची मागणी
निलंबनाची कारवाई रद्द करावी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एस.टी. महामंडळाच्या (S.T. Corporation) कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात संप सुरू आहे. आपल्या न्याय हक्कासाठी एस.टी. कर्मचारी (S.T. Staff) शांततेत संपात सहभागी आहेत. परंतु, राज्य सरकारने काही एस.टी. कर्मचार्‍यांना संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे. हे निलंबन एस.टी. कर्मचार्‍यांसाठी अन्यायकारक आहे.

ते त्वरित रद्द करावे. अशी मागणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री (Union Minister of State for Health and Family Welfare) डॉ. भारती पवार (dr. bharti pawar) यांनी केली आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या मागण्यांचा विचार करत त्यांच्याशी संवाद साधून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई (suspension action) रद्द करावी अशी मागणी पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री (CM) व परिवहन मंत्री (Minister of Transport) यांच्याकडे केली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न

एसटीचा संप चिघळत असून आंदोलन (Movement) केले म्हणून कामावरून निलंबित (suspended) केल्याने महिला कर्मचारीने पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा (suicides) प्रयत्न केल्याची घटना नाशकात (nashik) घडली. सुदैवाने, लहान बहिणीने वेळीच तत्परता दाखविल्याने या कर्मचार्‍यांचा जीव वाचला. महिला कर्मचारी पंचवटी डेपोत (Panchavati Depot) कामाला आहे. या ठिकाणी तिला तीन महिने निलंबनाची नोटिस देण्यात आली होती.

या महिलेला आई-वडील नसून लहान बहिणीची जबाबदारी या महिलेवरच आहे. याबाबत एका व्हिडीओ (video) मध्ये या महिलेने व्यथा सांगितली. तीन महिने पगार मिळणार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. या विवंचनेत या महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com