नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

संभाजी स्टेडियम येथे झालेल्या युवकाच्या खुनानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संभाजी स्टेडियम येथे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास योगेश तांदळे हा युवक मद्यपान करून आपल्या दोन सहकारी मित्रांसोबत स्टेडियम मध्ये फेरफटका मारत होता. अशातच याठिकाणी बसलेल्या काही युवतींना त्यांने शिवीगाळ करत त्या ठिकाणी गोंधळ घातला.

यावेळी संशयित दोघांनी त्यांच्या मैत्रिणींना घरी सोडून येत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले व घटनास्थळावरून पलायन केले या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे सह गुन्हे शाखा युनिट क्रमांक १व 2चे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी करून राहुल मालोदे, रा. पाथर्डी व आदित्य सुतार, रा. लेखानागर या दोन संशयितांना अटक करण्यास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला यश आले.