पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयिताचे पलायन

पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयिताचे पलायन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मध्यवर्ती कारागृहातून Central Jail एका गुन्ह्यात तपास कामी ताब्यात घेतलेल्या संशयिताने तोंड धुण्याचा बहाणा करत द्वारका पोलीस चौकीतून Dwarka Police Station पलायन केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलिसांनी Mumbai Naka Police दोन संशयितांना एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत त्यांना ( दि.२१ ) न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान आज ( दि. २२ ) दोघा संशयितांना पोलिसांनी तपास कामी द्वारका पोलीस चौकी येथे आणले होते. दरम्यान त्यातील एक संशयित अमोल साळुंखे याने तोंड धुण्याचा बहाणा करत पोलिस चौकीतून पोबारा केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वारका पोलीस चौकीत घडलेल्या प्रकाराबाबत संशयित अमोल साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या तपासाकरिता पोलिस पथके रवाना झाली असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल.

सुनील रोहकले, वपोनी, मुंबई नाका पोलीस ठाणे

Related Stories

No stories found.