खेलो इंडिया स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचा बोलबाला

खेलो इंडिया स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचा बोलबाला

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

हरयाणातील (Haryana) पंचकुला (Panchkula) येथे सुरु असलेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत (Khelo India Tournament) महाराष्ट्राच्या (maharashtra) खेळाडूंनी पदकांची लयलुट करीत पदतालिकेत पहिले स्थान पटकाविले आहे.

या स्पर्धेत पहिल्यांदाच योगासनांचाही समावेश करण्यात आला असून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या (Dhruv Global School) योगासनपटूंनी (Yogasana) पहिल्याच दिवशी पाच सुवर्णपदकांसह एका रौप्य पदकाची (Silver medal) कमाई केली आहे.

रविवारी झालेल्या योगासनांच्या सहा इव्हेंटसमध्ये ध्रुव ग्लोबलच्या स्पर्धकांनी ही सुवर्ण कामगिरी बजावली असून महाराष्ट्राला (Maharashtra) पाच सुवर्णपदकांसह (Gold medal) सहा पदके मिळवून दिली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राने आत्तापर्यंत नऊ सुवर्ण पदकांसह प्रत्येकी चार रौप्य व कांस्य पदकांसह अव्वल स्थान पटकाविले आहे. योगासनांना खेळांचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच त्याचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या योगासनांच्या महाराष्ट्र संघातील 22 जणांमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील 20 योगासनपटूंचा समावेश आहे.

योगासनांच्या पारंपरिक गटात महाराष्ट्राच्या सुमीत बंडाळे याने सुवर्णपदक प्राप्त करीत योगासनांमध्ये महाराष्ट्र संघाचे खाते उघडले. तर मुलींच्या याच गटात ध्रुवच्याच तन्वी रेडीज या योगासनपटूने रौप्य पदक मिळविले. मुलांच्या अर्टिस्टिक दुहेरी योगासन प्रकारात आर्यन खरात व निबोध पाटील यांच्या जोडीने तर मुलींच्या गटात वैदही मयेकर व युगांका राजम यांच्या जोडीने सुवर्ण पदकांची कमाई केली.

रिदमीक योगासन प्रकारात मुलांच्या दुहेरी गटात नानक अभंग व अंश मयेकर यांनी तर याच प्रकारातील मुलींच्या गटात स्वरा गुजर व गीता शिंदे यांनी संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचेे कौतूक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com