नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
पाणी साचत असल्यामुळे शहराचे दोन भाग होवून जनतेसह विद्यार्थी (Students) व रूग्णांचे हाल करणार्या भुयारी मार्गाच्या (Subway) उद्भवलेल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभागातर्फे (railway department) निर्णयक्षम अधिकार्याची नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar), आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्यासह रेल्वेंच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत (online meeting) घेण्यात आला.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. सुहास कांदे यांनी भुयारी मार्गाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मुद्दा बैठकीत लावून धरला. आ. कांदे यांनी रेल्वे यंत्रणेला चांगलेच धारेवर धरल्याने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, भुसावळ (Bhusaval) विभागाचे महाप्रबंधक एस.एस. केडिया यांनी ही समस्या मार्गी लावण्यासाठी येत्या काही दिवसात निर्णयक्षम अधिकार्याची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.
भुयारी मार्गाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आ. सुहास कांदे यांच्यासह महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, एस.एस. केडिया यांच्यासह नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, मुख्याधिकारी विवेक धांडे आदी सहभागी झाले होते.
या बैठकीत आ. कांदे यांनी रेल्वे यंत्रणेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वेच्या भुयारी मार्गात 28 दिवसापासून पाणी साचल्यामुळे शहराचे दोन भाग झाले. यामुळे पादचार्यांसह विद्यार्थी व रूग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत असतांना देखील रेल्वे प्रशासन या समस्येप्रश्नी कोणतीच उपाययोजना करत नाही. काहीतरी सांगून जनतेची दिशाभुल केली जाते.
रेल्वेचे अधिकारी खोटे बोलतात परंतू जनतेला उत्तरे आम्हाला द्यावी लागतात. भुयारी मार्गाचे काम चुकीच्या पध्दतीने करणार्या ठेकेदारास अभय तर जनतेस त्रास असे काम तुमच्यातर्फे सुरू असल्याचे आ. सुहास कांदे यांनी सांगत रेल्वे अधिकार्यांना धारेवर धरले. कमी क्षमतेच्या मोटारी बसवणे, तांत्रिक दृष्ट्या भविष्यातील धोके लक्षात न घेता सबवे बांधण्याची घाई भुयारी मार्गातील लिकेज बंद न करणे आदी समस्यांकडे आ. कांदे यांनी महाप्रबंधकांचे लक्ष वेधले.
राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील भुयारी मार्गात सतत गळती होवून पाणी साचत असते. घाईघाईने काम केल्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. त्यावर योग्य तोडगा काढत भुयारी मार्गात पाणी साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी रेल्वेच्या महाप्रबंधकांना दिले.
मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याचे अधिकार्यांनी सांगताच शहरात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला हे मान्य असले तरी इगतपुरी ते भुसावळ दरम्यान कोणता रेल्वे बोगदा यशस्वी झाला ते सांगा असा खडा सवाल आ. कांदे यांनी महाप्रबंधकांना केला. भुयारी मार्गाचे काम सुरू करतांनाच जर या सर्व बाबींचा विचार केला असता तर ही वेळ आली नसती आता तरी दिरंगाई न करता त्वरित कामास सुरुवात करावी ही आ. कांदे यांनी शेवटी केली.
ना. पवार यांनी आ. कांदे यांनी मांडलेल्या सर्व समस्या लक्षात घेऊन तातडीने सोडविण्याच्या सूचना रेल्वे अधिकार्यांना दिल्या. या बैठकीत रेल्वेचे डिव्हिजनल इंजिनियर आर.सी. वाडेकर, सिनियर इंजिनियर रमेशकुमार मिना, पो.नि. कातकडे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, युवासेना प्रमुख सागर हिरे यांनी सहभाग घेतला.