आदिवासी सहकारी सोसायट्यांचा संप मागे

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची यशस्वी मध्यस्थी
आदिवासी सहकारी सोसायट्यांचा संप मागे

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी सोसायट्यांच्या विविध कार्यकारी सहकारी सचिव व कर्मचारी यांनी tribal co-operative societies विविध मागण्यांसाठी दीर्घ काळ सुरू ठेवलेला संप विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेतला.

शासन आणि शेतकरी ग्रामीण जनता यांच्या दुवा असणार्‍या आदिवासी सहकारी सोसायट्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे. झिरवाळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला असून कर्मचारी रुजू झाल्याची माहिती जिल्हा सचिव संघटना अध्यक्ष एकनाथ गुंड यांनी दिली.

जिल्ह्यात आदिवासीबहुल भागात 166 आदिवासी विविध सहकारी संस्था कार्यरत आहेत. आदिवासी विकास संस्थांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. करंजाळी येथे झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला.

यावेळी पेठ तालुका सभापती विलास अलबाड, जि.प. सदस्य भास्कर गावित, आदींसह संस्थेचे चेअरमन मनोहर गावंडे, युवराज गावंडे, जिल्हा सचिव संघटना अध्यक्ष एकनाथ गुंड, उपाध्यक्ष पुंडलिक सहारे, खजिनदार लक्ष्मण भरीत, सदस्य वामन राऊत पालवी, अनिल पगारे, अरुण अपसुदे, मनोहर शिंगाडे, मनोहर जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व सचिव व सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com