पक्ष की बात : राष्ट्रवादी काँग्रेसची व्यूहरचना

‘वंचित’ला मोर्चाचा फायदा होणार का?
पक्ष की बात : राष्ट्रवादी काँग्रेसची व्यूहरचना
पक्ष की बात

नाशिक | निशिकांत पाटील Nashik

महापालिका निवडणुकीसाठी NMC Upcoming Elections अद्यापपर्यंत प्रभागरचना जाहीर न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा दबका सूर तर आहेच मात्र महाविकास आघाडीने जर एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार केला तर बंडखोरी पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने थांबवतील? यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर्क-वितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वीच 500 हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यानुसार जो तो इच्छुक उमेदवार त्याला ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात देखील कामे करताना सध्या दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध विषयांच्या मागण्यांसाठी विभागीय कार्यालय तसेच पोलिस ठाण्यांमध्ये निवेदन देत आपले काम सुरू ठेवले आहे.

सध्या राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या जरी कमी असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाशकात असलेले उमेदवार हे अवघ्या काही हजारांच्या फरकाने पराभूत झाले तर देवळाली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहेर ह्या निवडणूक जिंकून आल्यामुळे पक्षातर्फे सर्वच वरिष्ठांना आपापल्या परिसरातून उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून आणता येईल व त्यासाठी काय व्यूहरचना करावी लागेल याची चाचपणी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आगामी मनपा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सूत्र भुजबळ फार्म वरून फिरतील यात शंकाच नाही, गेल्या निवडणुकीत भुजबळ तुरुंगात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मनपात जास्त नगरसेवक निवडून आणता आले नाही. मात्र यावेळेस भुजबळ आपले ’बळ’ नक्कीच लावतील हे भुजबळ फार्म वरील होणार्‍या गर्दीतून दिसून येत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने व काँग्रेसने स्वतंत्र लढावे अशी चर्चा बर्‍याच ठिकाणी दिसून येत आहे. मात्र जर महाविकासआघाडी झाली तर मनपा निवडणूक ही फारच गुंतागुंतीची ठरेल व ती भाजपच्या पथ्यावर पडेल अशी चर्चा देखील इच्छुकांमध्ये होताना दिसून येत आहे.

राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे आधी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी वर निवडणूक लढत नंतर शिवसेनेशी हातमिळवणी केली होती त्याच प्रमाणे नाशिक महानगरपालिकेत देखील मैत्रीपूर्ण लढत करून नंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र यावे यामुळे बंडखोरी टळेल अशी चर्चा देखील इच्छुकांमध्ये आहे.

‘वंचित’ला मोर्चाचा फायदा होणार का?

वंचित बहुजन आघाडी पक्षाने Deprived Bahujan Aghadi Party ओबीसींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात विधान भवनावर काढलेल्या मोर्चामुळे त्याचा परिणाम नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक शहराध्यक्षपदी अविनाश शिंदे यांची निवड झाल्यानंतर संपूर्ण शहरात अडीशे शाखा उघडण्यात आल्या. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चावर जिल्हाध्यक्ष पवन पवार व शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वात नाशिक शहर व जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला धडकले होते.

ओबीसींच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारने त्याचा दुसर्‍या दिवशी निर्णय घेतला. याचे श्रेय वंचित आघाडीला जात असल्याचे शहराध्यक्षांनी मत व्यक्त केले. सध्या वंचित बहुजन आघाडी नाशिक मधील 133 प्रभागांमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे समजते आतापर्यंत शहराध्यक्ष शिंदे यांच्याकडे साडेसातशे इच्छुकांचे अर्ज देखील आले आहेत. येत्या काही दिवसात इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरू होणार आहे सध्या नुसते यावरच लक्ष केंद्रित न करता खुल्या व ओबीसी जागांकडे देखील लक्ष केंद्रित केले जात असल्याची चर्चा आहे.

तर खुल्या व ओबीसी गटांसाठी दीडशे इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. सध्या महाविकासआघाडी मध्येच मनपा निवडणुकीत युती होईल की नाही यामध्ये शक्यता व तर्कवितर्क लढवले जात असताना भाजप किंवा शिवसेना वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करेल का, असा प्रश्नदेखील सध्या चर्चिला जात आहे.

Related Stories

No stories found.