डोंगर्‍यादेव उत्सवास प्रारंभ

डोंगर्‍यादेव उत्सवास प्रारंभ

लोहणेर । वार्ताहर | Lohner

लोहोणेर (Lohner) येथील खालची वस्ती भागात डोगर्‍या देव (Dogarya Dev) उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आल्याने परिसरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आदिवासी समाजाचे (tribal community) दैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवास मार्गशीर्ष महिन्यात प्रारंभ केला जातो.

कडाक्याची थंडी (cold) असली तरी समाजबांधवांतर्फे अत्यंत कडक व्रत वैकल्यास प्रारंभ करण्यात येवून डोंगर्‍यादेव उत्सवास प्रारंभ केला गेला. समाज बांधव या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दि. 7 डिसेंबर रोजी देव गड भेट करण्यात येणार असून 8 डिसेंबर रोजी भंडार्‍याचे आयोजना नंतर या उत्सवाची (festival) सांगता केली जाणार आहे.

डोंगर्‍यादेव उत्सवानिमित्त धवळ, पाच माऊल्या, कोठारी, भंडारी, कुठया, टापरा, यांचे सह वाघदेव, अग्नी, काळभूत, काळभैरव, बरकती बाबा, नागदेव आदी देवतांची स्थापना करून आराधना करण्यास समाजबांधवांतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. हा उत्सव पार पडेपर्यंत पायात चप्पल न घालणे, डोक्याला तेल न लावणे, केस न विचरणे, तेलकट, तिखट व मीठ न खाणे, फक्त मुगडाळ, मसुरडाळ, कमारी (बाजरीची भाकरी ) सायंकाळी सेवन केली जाते.

तर दिवसभर उपवासाच्या वेळी फक्त गूळ व शेंगदाणे खाल्ले जातात. अत्यंत कडक असलेल्या या व्रताप्रसंगी ऐन कडक थंडीत पहाटेच्या वेळी नदीवर आंघोळ करून या माऊल्या दिवसभरच्या फेरीसाठी निघत असतात.

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या वंजार तांडाची मिरवणूक येथील कमला देवी मंदिरा पासून मुख्य स्थळा पर्यत संवाध्य वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी फेर धरून टाळी वाजत उपासक देवतांची गाणे म्हणत आराधना करत होते. अत्यंत श्रद्धेने डोगर्‍या देव उत्सवास समाजबांधवांतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com