क्रीडाप्रेमी मुख्याध्यापकांचा होणार सन्मान

स्व.खाशाबा जाधव स्मृती क्रीडादिनी कालिका ट्रस्टचा उपक्रम
क्रीडाप्रेमी मुख्याध्यापकांचा होणार सन्मान

नाशिक । प्रतिनिधी

स्व. खाशाबा जाधव स्मृती महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी मुख्याध्यापकांचा सत्कार कालिका देवी ट्रस्टच्या वतीने 15 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

खाशाबा जाधव यांनी सन 1952 च्या हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या ऑलीम्पिक स्पर्धेत भारताला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे. ही कामगिरी फार मोठी आणि मोलाची आणि सर्वांना प्रेरणादायी आहे.

यामुळे त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन नाशिकच्या कालिका देवी ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस. फौंडेशन यांच्या वतीने मागील दोन वर्षांपासून 15 जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तिसर्‍या महाराष्ट्र दिनानिमित्त 15 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता कालिका देवी मंदिरच्या हॉलमध्ये नाशिक जिल्हातील शाळा, महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य अश्या 25 मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व क्रीडाप्रमींनी उपास्थित राहावे असे आवहान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सत्कारार्थी असे

एल. एस. जाधव (सी. डी. ओ मेरी), डी. एन वाणी (पुरुषोत्तम स्कुल), मुरलीधर हिंडे (न्यू इंग्लिश स्कुल, आडगाव), अरुण गायकवाड (जु .स. रुंगठा), संजीवनी धामणे(र. ज बिटको), साहेबराव अहिरे( टी. जे. चव्हाण), शरद गीते( दे. केअर स्कुल), एकनाथ जगताप( रवींद्र विद्यालय), सिस्टर टेस्सी अ‍ॅन्टो ( सॅकरेट हार्ट स्कुल), शिल्पा बोरीचा ( गुरु गोविंदसिंग स्कुल), मनोहर महाजन ( पोद्दार स्कुल),

सिस्टर ऍसिस फर्नांडिस ( सेंट फिलोमिना स्कुल), माधुरी कसबे ( सेंट लॉरेन्स स्कुल), अलका दूनबळे ( के.जे मेहता स्कुल ज्यू. कॉलेज), शण्मुख सुंदर ( केम्ब्रिज स्कुल), सुरेखा कुलकर्णी(होरायझन अकादमी), स्वाती परचुरे (इंग्लिश मिडीयम स्कुल, सिडको), सुगंधा सोनावणे (वैशंपायन विद्यालय), संजय पाटील (सेंट फ्रान्सिस स्कुल, राणेनगर), नीना जोनाथान(पोद्दार इंटरनॅशनल, पाथर्दी) इंदू जायन(गुरु गोविंदसिंग स्कुल प्रा.) राजू सोनावणे (सेंट पीटर स्कुल), अमोल कदम (एस एम जी एस. स्कुल) यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com