युवकांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवकांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणगाव। वार्ताहर Thangaon

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) 15 ते 18 वयोगटातील मुला - मुलींसाठी सोमवारपासून (कोव्हक्सिन) करोना (corona) प्रतिबंधक लसीकरण मोहीम (Vaccination campaign) सुरू झाली असून

त्या अनुषंगाने बार्‍हे प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) व स्वदेस फाऊंडेशन (Swades Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधिकारी डॉ. अपेक्षा जाधव (Medical Officer Dr. Apeksha Jadhav), डॉ. अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) आंबुपाडा बे शासकीय आश्रम, बार्‍हे डांगसेवा मंडळ माध्यमिक विद्यालयात लसीकरणाला किशोरवयीन मुला - मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दोन्ही शाळा (schools) मिळून 200 मुला - मुलींनी कोव्हक्सिनची (co-vacine) लस घेतली. आरोग्य सहाय्यक जगदीश सोनवणे, आरोग्यसेविका मोहना पाडवी, भारती मोरे, मालती देशमुख, वाघमारे, आरोग्यसेवक नरेंद्र बागुल, सचिन साबळे तसेच यांनी कामकाज पाहिले. यावेळी मुख्याध्यापिका जगताप, स्वदेस फाऊंडेशन कर्मचारी तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.

देशातील सर्वात मोठ्या अभियानाला सुरुवात केली आहे .यात आपण 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्र बार्‍हे अंतर्गत येणार्‍या सर्व ठिकाणी कोव्हक्सिन लस देण्यात येत असल्याने जास्तीत-जास्त 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनी लस घ्यावे जेणे करून करोना व ओमॉयक्रोन या आजारापासून आपण वाचू शकतो. आपली हिम्युनिटी पावर वाढू शकते.

डॉ. अपेक्षा जाधव, वैद्यकीय अधिकाराी, बार्‍हे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com