भरधाव कार थेट कोसळली नाल्यात

भरधाव कार थेट कोसळली नाल्यात

नाशिक | Nashik

भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओवरील ताबा सुटल्याने वाहन थेट नाल्यात कोसळल्याची घटना नाशिक शहरातील सिडको भागात घडली आहे...

या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने तसेच रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली आहे.

भरधाव कार थेट कोसळली नाल्यात
Nashik : आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

याबाबत माहिती अशी की स्कॉर्पिओ वाहन चालक निशान श्रीवास्तव, 25 संजीव नगर अंबड हे त्यांच्या ताब्यातील महिंद्र स्कॉर्पिओ वाहन (एमएच १५ इबी ६९५०) ने आज पहाटे पाच साडेपाच वाजेच्या सुमारास माऊली लॉन्स परिसरातून जात असताना पुलावरील वळण लक्षात न आल्याने त्यांची चार चाकी वाहनाचा ताबा सुटल्याने थेट नाल्यात जाऊन कोसळली.

भरधाव कार थेट कोसळली नाल्यात
UPSC चा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका

या अपघातात निशांत श्रीवास्तव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान चौघांनाही पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले तीन विद्यार्थी हे नाशिक मधल्या नामांकित कॉलेजचे असल्याचे समजत असून या अपघातात चार चाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नाल्यात कोसळलेल्या स्कॉर्पिओ वाहनाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com