'ए यार, पुन्हा कधी एन्जॉय करू' गाणं आज होणार प्रदर्शित

'ए यार, पुन्हा कधी एन्जॉय करू' गाणं आज होणार प्रदर्शित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेले सोमेश्वर धबधबा, पांडवलेणी, नवश्या गणपती, गंगाघाट, बालाजी मंदिर या सर्व गोष्टींना नाशिककर मुकला आहे. मित्र मैत्रिणी, परिवारा सोबत कधी एकदा परत जाऊन तिथली मजा एन्जॉय करू असं प्रत्येकाला झालं आहे. नाशिककरांची ही भावना लक्षात घेऊनच नाशिकचे रेडिओ मिरची आरजे भूषण यांनी ( Radio Mirchi RJ Bhushan ) " ए यार, पुन्हा कधी एन्जॉय करू" ( The song "A yar, punha kadhi enjoy karu" )या नवीन गाण्याची निर्मिती केली आहे.

मागील वर्षी खूप व्हायरल झालेल्या "माझ्या नाशिकला मी मिस करतोय" या गाण्यानंतर यंदा नाशिककर आता गाण्याच्या रूपाने नाशिकमधील सगळी ठिकाणे एन्जॉय करू शकणार आहेत.

आज (दि.१०) दुपारी १ हे गाणे समाजमाध्यमांवर प्रदर्शित होणार आहे. सर्व नाशिककरांनी संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरी राहूनच डिजिटल स्क्रीनमार्फत त्यांच्या मनातील "नाशिक एन्जॉय करायचं आहे", असे प्रतिपादन भूषण यांनी केले आहे.

हे गाणे भूषण यांनी लिहिले असून त्यांनी गायलेदेखील त्यांनीच आहे. या गाण्यासाठी संगीत आणि बासरीवादन मोहन उपासनी यांनी दिले असून, गिटार नरेंद्र पुली, बेस गिटार निलेश सोनवणे, कीबोर्ड ईश्वरी दसककर तर ऑक्टोपॅड वर अभिजित शर्मा यांनी साथ संगत केली आहे.

पुष्कराज जोशी यांनी या गाण्याची पटकथा लिहिली आहे. रवींद्र जन्नावार यांनी दिग्दर्शन केले आहे. तर हर्षल भुजबळ यांनी गाण्याचे एडिटिंग व मिक्सिंग केले आहे. गाण्यामध्ये भूषण यांनी स्वतः भूमिका केली असून त्यांच्यासमवेत नाशिकमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा देखील समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com