Video : साप जेव्हा चारचाकीने प्रवास करतो!

तब्बल दोन किलोमीटर प्रवास
Video : साप जेव्हा चारचाकीने प्रवास करतो!

नाशिक |Nashik

साप दिसला की चांगल्या चांगल्यांची धांदल उडते असाच एक अनुभव नाशकातील (Nashik) एका व्यक्तीला आला. महामार्गावरून प्रवास (Travel On Highway) करत असताना  चारचाकी च्या काचेवर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत सापाने प्रवास (Snake Travel) केल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक येथील रत्नदीप सिसोदिया (Ratndip Sisodiya) हे ( दि.११ ) परिवारासह मुंबई आग्रा महामार्गाने (Mumbai Agra Mahamarg) मध्यप्रदेश (Madhyapradesh) येथील एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. परत येत असताना शिरपूर (धूळे) (Dhule) जवळ त्यांना गाडीच्या काचेवर सहा फुटी धामण जातीचा सर्प (Dhaman snake) दिसला.

त्यांनी त्वरित गाडीच्या काचा वर घेत वेग कमी केला व रस्त्यालगत असलेले महामार्ग पोलिसांच्या चौकीवर गाडी उभी केली. महामार्ग पोलिसांनी (Highway Police) त्वरित सर्पमित्र प्रेम बिर्‍हाडे (Snake Friend Prem Birhade) यांना बोलविले.

दरम्यान साप गाडीच्या खाली आत मध्ये शिरल्याने गाडी त्वरित महामार्ग लगत असलेल्या सर्विस स्टेशन वर नेत रॅम्पवर चढवली व गाडीच्या खालच्या बाजूने सहा फुटी धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडून जंगलात सोडले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com